Maharashtra Monsoon Session 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Session 2023 : शेतकरीप्रश्‍नी विरोधक आक्रमक

Farmers Issue : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. ‘शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी, शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांवर अन्याय, करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

अधिवेशन काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आगमनावेळी नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढल्याने त्यांनाही टिकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सरकार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष एकत्र येऊन पायऱ्यांवर आंदोलन करत होते.

कांद्याचे भाव पडल्यानंतर कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन केले जात होते. विधिमंडळाच्या आवारात कांदे अथवा आंदोलनाचे साहित्य आणण्यास मज्जाव केला जात असला तरी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यकर्ते खुष्कीच्या मार्गाने साहित्य आणत आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन होत असे.

यात धनंजय मुंडे, अनिल पाटील यांच्यासारखे नेते आघाडीवर असायचे मात्र, आता चित्र बदलले आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंदोलनात सहभागी झाले.

‘शासन आपल्या दारी, बळीराजा कर्जबाजारी, शासन आपल्या दारी, कृषिमंत्र्यांच्या बोगस धाडी, शासन आपल्या दारी एकही योजना नाही खरी, शासन आपल्या दारी खते व बियाणांच्या किमती भारी, शासन आपल्या दारी, कांद्याला भाव नसल्याने त्रस्त शेतकरी, सरकार त्रस्त सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त’ अशा आशयाचे फलक झळकावत जोरदार आंदोलन केले.

दानवे यांच्यासह जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सुनील प्रभू, रवींद्र धंगेकर, राजन साळवी यांच्यासह आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले.

फलकातून विचारला प्रश्न

दिवसाला सात आत्महत्या होत असल्याचे आरोप करत विरोधकांनी फलकाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले. ‘हमीभाव नाही, विमा सुरक्षा नाही, खंडित वीजपुरवठा, शेतकरी आत्महत्या, ५० हजार रुपयांचे प्रलंबित अनुदान, पीक कर्जासाठी सीबील सक्ती, अवकाळी पावसाची नुकसान भरपाई नाही, कांदा, कापूस पिकांना अनुदान नाही, पैसे भरूनही वीज जोडणी नाही, बोगस खते आणि बियाणांचा सुळसुळाट’ असे असतानाही सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे, अशी टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT