Paddy Production Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Plantation : भात, नागलीच्या पुनर्लागवडी तूर्त पुढे ढकलण्याचा सल्ला

Kharif Season : अतिपावसाच्या शक्यतेने पाच जिल्ह्यांमधील भात व नागलीच्या पुनर्लागवडी काही दिवस पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : अतिपावसाच्या शक्यतेने पाच जिल्ह्यांमधील भात व नागलीच्या पुनर्लागवडी काही दिवस पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात सरासरी १५ लाख हेक्टरवर भात पिकवला जातो. त्यापैकी आतापर्यंत ५५ टक्के म्हणजे ८.३५ लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. म्हणजेच भाताच्या जवळपास ४४ टक्के पुनर्लागवडी बाकी आहेत.

नागलीचे एकूण क्षेत्र ७.८१ लाख हेक्टर आहे. त्यापैकी अजून ६४ टक्के क्षेत्रावर नागलीच्या पुनर्लागवडी झालेल्या नाही. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांकडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुनर्लागवडीची कामे केली जातात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील कृषी हवामान केंद्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर भारतीय हवामान खात्याने कृषी सल्ला जारी केला आहे. २९ जुलैपर्यंत कोकणात, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार व अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भात व नागलीची लागवड याच पट्ट्यात होत असते. विदर्भात देखील भाताचे क्षेत्र मोठे आहे. विदर्भात तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे. रत्नागिरी, रायगड तसेच ठाणे व पुणे जिल्ह्यांचा घाट भागाचे क्षेत्र तसेच सातारा जिल्ह्यातील पावसाच्या पट्ट्यातील भात व नागलीच्या रोपवाटिका आता पुनर्लागवडीच्या तयारीत आहेत. मात्र ही लागवड तूर्त पुढे ढकलावे.

कृषी खात्याच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे म्हणाले, की राज्यभर भात व नागलीच्या रोपवाटिका तयार होण्यासाठी चांगला पाऊस होतो आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुनर्लागवडी पुढे ढकलण्याचा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला असल्यास त्यानुसार नियोजन करणे योग्य राहील. अर्थात, ३-४ दिवस पुनर्लागवड पुढे ढकलल्यामुळे उत्पादनावर काहीही परिणाम होत नाही. ८-१० उशीर केल्यास मात्र प्रतिकूल परिणाम उद्‍भवतात.

खते, कीटकनाशकांचा वापर तूर्त टाळावा

अतिपाऊस झाल्यास भात, नागलीच्या रोपवाटिका चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी तसेच शेताची बांधबंदिस्ती योग्य राहण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी या पाच जिल्ह्यांत तूर्त खतांचा मात्रा देणे तसेच कीटकनाशकांची फवारणीची कामे पुढे ढकलावी, असाही सल्ला देण्यात आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT