Paddy Production
Paddy ProductionAgrowon

Paddy Plantation : सिंधुदुर्गात ७५ टक्के भातरोपांच्या पुनर्लागवडी पूर्ण

Kharif Paddy : यावर्षीचा खरीप हंगाम दरवर्षीपेक्षा २० दिवस उशिराने सुरू झाला.मॉन्सूनचे आगमनच जूनच्या अखेरीस झाले. त्यामुळे भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला देखील विलबांने सुरुवात झाली.
Published on

Sindhudurg News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ७५ टक्के भातरोपांच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत.पावसामध्ये सातत्य राहिल्यास पुढील आठ ते दहा दिवसांत पुनर्लागवडीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

यावर्षीचा खरीप हंगाम दरवर्षीपेक्षा २० दिवस उशिराने सुरू झाला.मॉन्सूनचे आगमनच जूनच्या अखेरीस झाले. त्यामुळे भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला देखील विलबांने सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भात रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरू होती.

मात्र तत्पूर्वी पाण्याची उपलब्धता असलेल्या दहा टक्के भात रोपवाटिका मे अखेरीस तयार करण्यात आल्या होत्या. ती भातरोपे २० जूननंतर पुनर्लागवडीस तयार झाली होती. परंतु पावसाअभावी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या भातरोपांची पुनर्लागवडीला सुरुवात झाली.

Paddy Production
Paddy Pest : आचऱ्यात भातरोपांवर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकांमधील रोपे पुनर्लागवडीस १० जुलैपासून सुरुवात झाली. ही पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर सतत दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातरोपे पुनर्लागवडीचे काम अखंडपणे सुरू आहेत. आतापर्यंत ४५ हजार हेक्टरवरील भातरोपे पुनर्लागवडी पूर्ण झाली आहे.

Paddy Production
Paddy Production : चारसूत्री तंत्रातून भात उत्पादनात वाढ...

यावर्षी साधारणपणे ६० ते ६२ हजार हेक्टरवर पुनर्लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत भातरोपे पुनर्लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांत ८५ टक्केपेक्षा अधिक पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. तर कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये ७० टक्के लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com