Paddy Plantation Method : भाताची रोवणी श्री पद्धतीने करा

Kharif Paddy : तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याच्या आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
Paddy Plantation
Paddy PlantationAgrowon

Nagpur News : जिल्ह्यामध्ये भाताची रोवणी करताना श्री पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यामध्ये जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी व त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव रविवारी (ता. २३) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला.

Paddy Plantation
Paddy Production : चारसूत्री तंत्रातून भात उत्पादनात वाढ...

तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याच्या आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथ लांजेवार यांच्या शेतावर बेडवर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी पारशिवनी सूरज शेंडे, गावचे सरपंच छाया मधुकर नेवारे, पोलिस पाटील प्रेमला भोयर, प्रगतिशील शेतकरी श्रावण इडपाची, सूर्यभान राऊत, लक्ष्मण लांजेवार, हेमराज भुतांगे, कृषी पर्यवेक्षक, पी.सी. झेलगोंदे, जे. बी. भालेराव, कृषी सहाय्यक आर. डी. सोरमारे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्वतः धान बांधित उतरून रोपलावणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com