Agrim crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Agrim Crop Insurance : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर

Pik Vima : पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यातील खरीप पिके घोक्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा मंजूर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Swapnil Shinde

Advance Crop Insurance : मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये कृषी, महसूल विभागामार्फत पीकविमा कंपनीला सोबत घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत

त्यानुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी अधिसूचना काढली आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील ८७ मंडळात २५ टक्के अग्रीम पीकविमा मंजूर झाले. त्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे.

संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाड्यात नांदेड व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते.

त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी शेतकऱ्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये कृषी, महसूल विभागामार्फत पीकविमा कंपनीला सोबत घेऊन पंचनामे केले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ८७ मंडळामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळं संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा निकष काढला.

त्यानुसार अधिसूचना निर्गमित करत ८७ महसूल मंडळातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. या अग्रीम पीक विम्याचे एका महिन्यात वितरण होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT