Ambajogai APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Ambajogai APMC News: अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापतिपदी ॲड. राजेश्‍वर चव्हाण

APMC Election Result : बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. पोतंगले यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाची बैठक बाजार समितीच्या कार्यालयात झाली.

Team Agrowon

Beed News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्‍वर चव्हाण यांची व उपसभापतिपदी लक्ष्मण करनर यांची बिनविरोध निवड झाली. शनिवारी (ता. १३) सकाळी ही निवड होताच कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला.

बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. पोतंगले यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाची बैठक बाजार समितीच्या कार्यालयात झाली.

या निवडणूक प्रक्रियेत सभापतीसाठी राजेश्‍वर चव्हाण व उपसभापतिपदासाठी लक्ष्मण करनर या दोघांचेच उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे पीठासीन अधिकारी यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.

बीडचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या बाजार समितीत शेवटपर्यंत कोण सभापती होणार हे गुप्त ठेवले होते. ऐनवेळेस या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.

अखेर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला व परळी मतदार संघाला प्राधान्य देत सभापतिपदी संधी दिली, हे यावरून स्पष्ट झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT