Tomato Market Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Market : सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना टोमॅटोचे पैसे न दिल्यास कारवाई

Tomato Rate : टोमॅटोच्या नीचांकी दरामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. त्यात ठरलेल्या सौदाप्रमाणे गाळ्यावर टोमॅटो खाली न करता दर कमी दिला जातो.

Team Agrowon

Nashik News : टोमॅटोच्या नीचांकी दरामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. त्यात ठरलेल्या सौदाप्रमाणे गाळ्यावर टोमॅटो खाली न करता दर कमी दिला जातो. शिवाय रोख पेमेंटच्या नियमाला हरताळ फासत आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांना होते. ताटकळत ठेवले जाते.

त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांवर होणारा हा अन्यायकारक प्रकार त्वरित थांबवा, सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना टोमॅटोचे पैसे न दिल्यास संबंधित व्यापारी, अडतदार यांच्या परवाने रद्द कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपळगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने दिला आहे.

बाजार समितीचे संचालक व माजी आमदार अनिल कदम यांनी बुधवारी (ता. २०) बाजार समितीतील टोमॅटो विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या गाळ्यांना भेटी दिल्या. त्यात ठरल्यापेक्षा भाव कमी देणे, रोख पेमेंट न देणे अशा तक्रारी समोर आल्या.

यावर आमदार कदम यांनी गुरुवारी (ता. २१) संचालक मंडळ व व्यापारी अडतदारांची सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. या वेळी उपसभापती जगन कुटे, संचालक यतीन कदम, अमृता पवार आदी उपस्थित होते.

या वेळी कदम म्हणाले, की टोमॅटोचे दर कोसळलेले आहेत. या भावात तफावत करून टोमॅटो उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. सभापती आमदार दिलीप बनकर यांनी रोख पेमेंटच्या शिस्तीमुळे पिंपळगाव बाजार समितीचा नावलौकिक आहे.

त्या नियमाची अंमलबजावणी व्यापाऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. तसेच बाजारभावात तफावत करणाऱ्या आणि रोख पेमेंट न देणाऱ्या व्यापारी, अडतदारांवर कारवाई करण्याचा इशारा या वेळी उपस्थित संचालकांनी दिला. व्यापारी आणि अवतार यांनी दिवसभर दुकान सुरू ठेवून शेतीमालाचे पैशाचे वितरण करण्यासह विविध सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस संचालक दीपक बोरस्ते, दिलीप मोरे, रामभाऊ माळोदे, गोकुळ गिते, डॉ. प्रल्हाद डेर्ले, राजेश पाटील, ज्ञानेश्‍वर शिरसाठ, नारायण पोटे, महेंद्र गांगुर्डे, मनिषा खालकर, शिरीष गडाख, सोहनलाल शंकरलाल ठक्कर, अडतदार सोमनाथ निमसे, अरुण चव्हाणके, सुधीर गवळी, राजेंद्र साळवे, सचिव संजय लोंढे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT