Sheep and Goat Husbandry agrowon
ताज्या बातम्या

Sheep and Goat Husbandry : मेंढी व शेळीपालन प्रशिक्षणात शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेतल्याचा आरोप

Sheep and Goat : मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी (ता. कवठेमहांकाळ) व आटपाडी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शेतकऱ्यांसाठी मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण सुरू आहे. दरम्यान हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी (ता. कवठेमहांकाळ) व आटपाडी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या शिबीरात शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रशिक्षण शुल्क पाचशे रुपये असताना एक हजार रुपये घेण्यात आले. जादाचे पाचशे रुपये चहा व नाष्ट्यासाठी असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रशिक्षणादरम्यान केवळ एक समोसा व चहा देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील आटपाडी पंचायत समितीमध्ये १८ ते ३० ऑगस्ट दरम्यान शेळी व मेंढीपालन प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले आहे. दरम्यान या शिबिराच्या नियमानुसार शेतकऱ्यांकडून ५०० रुपये शुल्क आकारण्यात येते. मात्र, प्रशिक्षणाचे आयोजक आटपाडी पशुसंवर्धन विभाग यांनी प्रशिक्षण शुल्क पाचशे रुपये असताना शेतकऱ्यांकडून चहा व नाष्ट्यासाठी अधिकचे पाचशे रुपये शुल्क आकारले आहे. या शिबिरास साठहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

शासनाच्या योजनांची पूर्ण माहिती व प्रशिक्षण लाभार्थी शेतकऱ्यांना व्हावे यासाठी अशा शिबिराचे आयोजन अत्यल्प दरामध्ये करण्यात येत असते. मात्र, आटपाडी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने या शिबिराच्या माध्यमातून हजारो रुपये कमावण्याचा उद्योग चालविल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला.

प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रतिदिन २० रुपयेप्रमाणे तीन दिवसांसाठी ६० रुपयांचा नाष्टा देऊन बाकीचे रुपये कोणाच्या खिशात घातले जाणार आहेत? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत आटपाडीचे पशुसंवर्धन अधिकारी अविनाश चव्हान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी शेळी-मेंढी पालकांना प्रशिक्षण घेण्यासाठी रांजणी येथे जावे लागते. मात्र, प्रशिक्षणार्थ्यांच्या विनंतीनुसार आम्ही आटपाडी पंचायत समितीमध्ये तीन दिवसांचे प्रशिक्षण ठेवले आहे. दोन दिवस आटपाडी येथे चहा, नाष्टा व प्रशिक्षण देण्यासाठी येणाऱ्या तज्ज्ञांच्या खर्चासाठी पाचशे रुपये जास्तीचे घेतले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर दरात वाढ, आले आवकेत घट, बटाटा दरात घसरण, भेंडी दरात नरमाई तर मेथीचे भाव टिकून

Sericulture Award 2026: ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक’ पुरस्कारासाठी गिते दाम्पत्याची निवड!

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना २५ हजार अनुदान; सदस्य, कार्यक्रम संख्येच्या निकषांत बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Rainfall Deficit: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० मंडलांत पावसाचा खंड

Crop Stress: पावसाची मोठी उघडीप? पिकाचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT