Onion Auction Nashik agrowon
ताज्या बातम्या

Onion Auction Nashik : 'कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार'

Nashik Onion Rate : जिल्ह्यात सध्या प्रतिदिन एक लाख क्विंटलचे लिलाव होतात. व्यापाऱ्यांच्या पावित्र्यामुळे प्रतिदिन २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली आहे.

sandeep Shirguppe

Abdul Sattar : नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघामार्फत (एनसीसीएफ) खरेदी केला जाणारा कांदा देशातील घाऊक बाजारात कमी किंमतीत विकला जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाल्याची तक्रार करत बुधवारी सकाळपासून व्यापारी लिलाव बंद करण्यात आले आहेत.

यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव जवळपास ठप्प झाले आहेत. जिल्ह्यात सध्या प्रतिदिन एक लाख क्विंटलचे लिलाव होतात. व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे प्रतिदिन २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली आहे.

यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, विविध कारणे देऊन व्यापारी लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. सत्तार येवला येथे एका खासगी कार्यक्रमास आले होते.

सध्या राज्यात गणपती आगमनाने सणासुदीचा काळ आहे. या काळात लिलाव बंद ठेवणे अयोग्य आहे. जे व्यापारी लिलाव बंद ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश आपण पणन आयुक्त व नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे यावेळी सत्तार यांनी सांगितले.

जोपर्यंत व्यापार करणे परवडत नाही, तोपर्यंत बाजार समितीतील लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे लासलगाव या मुख्य बाजार समितीसह अनेक बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे.

दरम्यान कांदा लिलाव बंद असल्याने शेतकरी कांदा लिलावासाठी बाजार समितीमध्ये येत नसल्याचे दिसून येत आहे. लिलाव ठप्प झाल्यामुळे ऐन सणासुदीत पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट आल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पणन मंत्र्यांनी २५ सप्टेंबर रोजी संघटनेला चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT