River Conservation Agrowon
ताज्या बातम्या

River Conservation Summit : पुण्यात नदी संवर्धनावर दोनदिवसीय परिषद

देशभरातील नदी, जलसंवर्धन, सांडपाणी प्रक्रिया पाण्याचा फेरवापर’ या विषयांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची राष्ट्रीय नदी परिषद होणार आहे.

Team Agrowon

पुणे : ‘देशभरातील नदी, जलसंवर्धन, (River Conservation) सांडपाणी प्रक्रिया (Waste Water Treatment) पाण्याचा फेरवापर’ या विषयांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची राष्ट्रीय नदी परिषद (National River Conference) होणार आहे.

या परिषदेचे संयोजन करण्यासाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेकडे आयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या परिषदेत देशभरातील प्रमुख ४४ शहरांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. नदी संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण होणार आहे.

या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभ्यासक, विविध महापालिकांचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, पाण्यासंबंधी काम करणाऱ्या स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

या परिषदेचे नाव ‘धारा’ असे असणार आहे. तलावांचे पुनरुज्जीवन, पाणी व्यवस्थापन, नदीकाठ सुधार, सांडपाण्यावर प्रक्रिया, पूर व्यवस्थापन, जल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन, नदी व अर्थकारण अशा विविध आनुषंगिक विषयांवर या परिषदेत चर्चा होईल. इस्राईल, जपान, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया यांसह अन्य देशांमधील नद्यांचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा आदी बाबींवरही चर्चा होणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT