Ganesh Festival Agrowon
ताज्या बातम्या

Millet Crop : शेतीचा काही भाग पारंपरिक भरडधान्यासाठी राखावा; बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

Ganesh Festival : एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ‘उत्सव गणेशाचा, आदर स्त्री शक्तीचा’ या संकल्पनेनुसार देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या विक्रमी कार्याविषयी मागील नऊ वर्षे देखावे सादर केले जातात.

Team Agrowon

Pune News : ‘व्यावसायिक शेती करताना शेतीचा काही भाग पारंपरिक भरडधान्य शेतीसाठी राखून ठेवावा. निरोगी आरोग्यासाठी पारंपरिक शेती गरजेची आहे,’ असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.

एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ‘उत्सव गणेशाचा, आदर स्त्री शक्तीचा’ या संकल्पनेनुसार देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या विक्रमी कार्याविषयी मागील नऊ वर्षे देखावे सादर केले जातात. या वर्षी ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षा’निमित्त देखावा सादर केला आहे. या देखाव्याच्या उद्‍घाटनप्रसंगी बीजमाता पोपेरे बोलत होत्या.

या वेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘राहीबाईंसारख्या बीजमातांनी केलेल्या कामांमुळे आपल्यापर्यंत भरडधान्य पोचले आहे. या पद्धतीने समाज पुढे गेल्यास लोक निरोगी राहण्यास मदत होईल.’’

या वेळी बीजमाता पोपेरे यांना पारंपरिक पद्धतीने खणा-नारळाची ओटी भरून, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी केली.

सूत्रसंचालन मंगेश खराटे, तर आभार चेतन अग्रवाल यांनी मानले. या वेळी सतीश खैरे, किशोर जैन, सुमंगल वाघ, किशोरी कचरे, ममता डाबी, अनघा पोतनीस, भारती घारे, हिमाली सडेकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT