River  Agrowon
ताज्या बातम्या

River : ‘चला जाणुया नदीला’ अभियानाचा घेतला आढावा

मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी केले व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे मार्गदर्शन

Team Agrowon

सोलापूर : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ‘चला जाणुया नदीला’ या अभियानाची व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे सोलापूर जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी हे अभियान कशा पद्धतीने राबविले गेले पाहिजे, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे. कोणकोणत्या पद्धतीने हे अभियान यशस्वी होईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा हे देखील यात सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणा म्हणाले, राज्य शासनाचे हे अभियान खूपच महत्त्वाचे असून, हे यशस्वी होणे गरजेचे आहे. या अभियानामध्ये १०८ नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभियान राबविताना प्रथम नदी प्रदूषण कोणत्या कारणांमुळे होत आहे ते शोधून काढणे महत्त्वाचे आहे. नदी प्रदूषणाची कारणे मिळाल्यानंतर त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. याचबरोबर या अभियानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. या अभियानात सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिक देखील सहभागी झाले पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, या अभियानासाठी सोलापूर जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक नदीसाठी एक स्वतंत्र गट निर्माण केला पाहिजे. या गटामध्ये नदीची पूर्ण माहिती असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाईल. प्रदूषण व वन विभाग यांचा सक्रिय सहभाग या अभियानामध्ये आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांच्यामार्फत शहरातील, गावातील सर्व सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. तेच पाणी नदीमध्ये जाते, हे टाळण्यासाठी सर्व विभागांचा देखील या अभियानामध्ये सहभाग घ्यावा लागेल. १३ डिसेंबर रोजी एक बैठक घेऊन या अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यात येईल, १५ डिसेंबरपासून प्रत्यक्षात कामाची सुरुवात करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT