River Conservation : जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान राबविण्यात जाणार आहे. त्या अंतर्गत १२ ते २५ डिसेंबरदरम्यान ‘नदी भेट’ कार्यक्रम होणार आहे.
Government Project
Government Project Agrowon

औरंगाबाद : जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ (Chala Januya Nadila) अभियान राबविण्यात जाणार आहे. त्या अंतर्गत १२ ते २५ डिसेंबरदरम्यान ‘नदी भेट’ कार्यक्रम होणार आहे. शिवना, खाम आणि दुधना नदीचा (Dudhana River) अभियानात समावेश करण्यात आला असून, २६ नोव्हेंबरला खाम नदीला भेट देण्यात येणार आहे.

Government Project
Sugar Price : साखरेच्या दरावर परिणाम होणार का ? | ॲग्रोवन

‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम वर्धा येथून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून २६ तारखेला खाम नदीला भेट देण्यात येणार आहे.

तसेच १२ ते २५ डिसेंबर या कालावधीत शिवना आणि दुधना नदी आणि परिसराला भेट देण्यात येणार आहे. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, रामेश्‍वर रोडगे, श्री. विधाते, राज्यस्तरीय समितीचे सदस्य रमाकांत कुलकर्णी, अभियानाचे समन्वयक अण्णा वैद्य, गोकुळ सुरासे, श्याम दंडे, सतीश वाघ तसेच संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

Government Project
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

अभियानाचे उद्दिष्ट

१.नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे

२. जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे

३. नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वंकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे

४. अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे

५. नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबबात प्रचार व प्रसार रूपरेषा आखणे

६.नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार याबाबत नियोजन करणे

७. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com