Crop Damage Survey Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : पीक नुकसानीच्या पंचनाम्याची प्रत शेतकऱ्यांना देण्यात यावी

Crop Damage : शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर विमा कंपनीने पीकनुकसानीचे पंचनामे ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात यावेत.

Team Agrowon

Parbhani News : शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर विमा कंपनीने पीकनुकसानीचे पंचनामे ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात यावेत.त्यांची एक प्रत तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यात पीकविमा योजनेसाठी वर्षी आय. सी. आय .सी. आय. लोंबार्ड ली. कंपनीची नियुक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पीक नुकसानाचे पंचनामे सर्वेक्षण ऑनलाइन पद्धतीने होत नसल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा मिळण्यापासून वंचित राहत आहेत. पीक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी पिक विमा कंपनीमध्ये सर्वे करण्यासाठी कृषी पदवीधारकांची भरती करावी.

अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, रामभाऊ आवरगंड, निवृत्ती गरुड, बाळासाहेब घाटोळ, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोंढे, उद्धव जवंजाळ, किरण गरुड, माउली शिंदे, पंडित भोसले, गोविंद वावरे, नामदेव काळे, विठ्ठल मोरे, नवनाथ घुले आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT