Crop Damage : भिलेत दहा दिवस शेती पाण्याखाली

Chiplun Agriculture News : समुद्राच्या भरतीचे खारे पाणी शेतात घुसून होणारे नुकसान टाळण्यासाठी खाडीकिनारी सरंक्षक बंधारे बांधून संबंधित क्षेत्र लागवडीलायक करण्याच्यादृष्टीने खारभूमी विकास योजना राबवली जात आहे.
Ratnagiri News
Ratnagiri News Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : खाडीपट्ट्यातील करंबवणे खाडीलगत असलेल्या भिले-जांभूळवाडी खार भूमी विकास योजनेच्या उघाडीची झडपे गेल्या महिनाभरापूर्वी निसटल्याने गेल्या दहा दिवसांपासून या परिसरातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. अखेर दहा दिवसांनी या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी केली. येथील शेतीचे पंचनामे सुरू झाले आहेत.

Ratnagiri News
Pomegranate Crop Damage : गुजरातमध्ये अतिवृष्टीचा मृग बहरातील डाळिंबाला फटका

समुद्राच्या भरतीचे खारे पाणी शेतात घुसून होणारे नुकसान टाळण्यासाठी खाडीकिनारी सरंक्षक बंधारे बांधून संबंधित क्षेत्र लागवडीलायक करण्याच्यादृष्टीने खारभूमी विकास योजना राबवली जात आहे. या योजनेतील भिले गावच्या खाजण जमिनीच्या लगत असलेल्या करंबवणे खाडीला वळसा घालणारा दोन किमी लांबीचा मातीचा बंधारा बांधण्यात आला आहे.

यातून पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या उघाडीची झडपे जोरदार पावसाच्या पाण्यात महिनाभरापूर्वा निसटली. झडपे निसटल्याने भरतीचे पाणी आतमध्ये घुसत आहे. दहा दिवस उलटून गेले तरीही शेतातील पाणी निघालेले नाही. नव्याने केलेली भात लावणी पाण्याखाली असल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Ratnagiri News
Heavy Rain Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख हेक्टरचे नुकसान

यासंदर्भात गुरुवारी (ता. २७) तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न मेहेत्रे, मंडल कृषी अधिकारी राहुल आडके, डी. के. काळे, कृषी सहायक सोनाली नलावडे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त शेती पाहणी केली.

सरपंच आदिती गुडेकर यांच्याशी चर्चा केली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे शुक्रवारपासून (ता. २८) सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वा निविदा काढून नवीन झडपे बसवण्यात आली होती. यासंदर्भात येथील खारभूमी कार्यालयात तक्रार झाल्यानंतरही महिनाभरात साधी पाहणी झाली नाही. कंत्राटदाराला सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com