Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : सावनेर तालुक्यात ३७ गावांमध्ये ६९ वनराई बंधाऱ्यांची साखळी

पंचायत समितीच्या वतीने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून श्रमदानाने तालुक्यातील ३७ गावांलगत असलेल्या ओढ्यांवर ६९ वनराई बंधारे बांधकाम करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

टीम ॲग्रोवन

सावनेर, नागपूर ः पंचायत समितीच्या वतीने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत (Water Conservation) लोकसहभागातून श्रमदानाने तालुक्यातील ३७ गावांलगत असलेल्या ओढ्यांवर ६९ वनराई बंधारे (Water Barrages) बांधकाम करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखडे यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी दीपक गरुड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीच्या कृषी विभागाने रामपुरी व मंगसा येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग मिळवून येथील गावालगतच्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले आहे.

याप्रसंगी कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखडे, प्रीती गाढे, कृषी विस्तार अधिकारी दिनेश खोपे, तांत्रिक सहायक सूरज शेंडे, रोजगार सेवक सचिन डबले, प्रवीण धमदे, विजय राहाटे, मंगसा येथील ग्रामसेवक अरुण देशभ्रतार व रामपुरी येथील ग्रामसेवक दत्तहरी चरटे उपस्थित होते. या बंधाऱ्‍यांमुळे पाण्याची साठवणूक होणार असल्याने त्याचा वापर रब्बी हंगामातील पिकांना व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी सोय होणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ओढ्यात पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या तात्पुरत्या स्वरूपाच्या कच्च्या बंधाऱ्‍यांमुळे ओढ्यातील पाणी साठविले जात आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती होत असल्याने वनराई बंधारे बांधकाम या उपक्रमासाठी गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सांगितल्या जात आहे.

या गावांत होणार वनराई बंधारे

सिरोंजी, सर्रा, सोनपूर, मंगसा, महारकुंड, नागलवाडी, पाटणसावंगी, गडेगाव, टाकळी, बडेगाव, जलालखेडा, खुबाळा, बिछवा, चांपा, सावरमेंढा, इसापूर, सावंगी हेटी, तेलंगखेडी, पटकाखेडी, पंढरी, खरडूका, गडमी, गुमगाव, वाकोडी, केळवद, गोसेवाडी, मानेगाव, ब्रह्मपुरी, पिपळा नांदुरी, माळेगाव जोगा, जोधपूर, माळेगाव टाऊन, जोगा, खैरी ढालगाव, किरणापूर आधी गावांमध्ये एकूण ६९ वनराई बंधारे बांधल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT