डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो?
डोळे येण्याचा संसर्ग सामान्यतः प्रथम एका डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच असे नाही. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेल्यास पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही, असे म्हटले जाते. त्यात तथ्य नाही. एकदा डोळे येऊन गेले, की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते, हे खरे. परंतु पुन्हा संसर्ग होणार नाही, असे नाही. तसेच डोळे येणे हा गंभीर आजार नव्हे, तरीही डोळे आलेल्या व्यक्तीने साथ पसरणे टाळण्यासाठी घरीच थांबावे.
लक्षणे
डोळ्यांना संसर्ग झाल्याचे ओळखणे फारसे कठीण नाही. डोळ्यांत सतत काहीतरी गेल्याची भावना होणे, डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळा लाल होणे, ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात. संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसू लागतात. डोळ्यातून पाणी येऊन किंवा पससदृश घाण येऊन प्रसंगी पापण्या चिकटतात. काही वेळा डोळ्यांना डोळे जड वाटते. एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही. काहींना कानाच्या समोरील भागातील ग्रंथींना सूज येते. विशिष्ट प्रकारच्या विषाणू संसर्गामुळे डोळे येण्याबरोबरच ताप, सर्दी, घसा दुखणे यात तक्रारीही जाणवतात. संसर्ग विषाणूजन्य असल्यास डोळ्यांना तात्पुरते अंधुक दिसणे, तीव्र प्रकाशाचा त्रास होणे, ही लक्षणे दिसू शकतात.
ग्रामीण भागात आजाराची लागण
बुलडाणा : जिल्ह्यात सर्वत्र डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. या आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डोळ्यांच्या आजाराचा संसर्ग आणि घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे औषध अशा वस्तू वापरल्यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
काय काळजी घ्यावी?
१. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, टिशू, साबण, टॉवेल इतरांनी वापरू नयेत.
२. डोळ्यांचा संसर्ग चार-पाच दिवस टिकतो. मग बरा होतो. पण या आजारावर स्वतःच्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत.
३. तुरटी, दूध, काजळ आणि इतर वस्तूंचा वापर करू नये.
४. औषधांच्या दुकानातून कोणतेही डोळ्यांचे ड्रॉप अंदाजाने वापरू नयेत. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
५. घराबाहेर पडताना गॉगल वापरावा. डोळे चोळू नये, यामुळे संसर्ग पसरण्याला अटकाव होऊ शकतो. डोळ्यांना वारंवार हात लावू नये.
६. स्टेरॉइड ड्रॉपचा अतिवापर करू नये. डोळ्यांच्या रुग्णांचे ड्रॉप दुसऱ्याने टाकू नये. डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे माशांमार्फत साथ पसरते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.