Water Storage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : पाणीसाठ्यांनी वाढवली चिंता

Marathwada Water Storage : : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमध्ये केवळ २२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमध्ये केवळ २२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी एक व ७४९ लघू प्रकल्पांपैकी ८१ लघू प्रकल्प प्रकल्पांतही पाण्याचा थेंब नाही.

दुसरीकडे ६२ लघू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. लांबलेल्या व अपेक्षेप्रमाणे बरसत नसलेल्या पावसाने अजूनपर्यंत पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सहाजिकच चिंतेत भर पडली आहे.

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पात आताच्या घडीला केवळ २.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे मध्यम ७५ प्रकल्पांचीही अवस्था फारशी बरी नसून, या प्रकल्पांमध्ये केवळ ४.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ६.७५ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये १८.९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी सिद्धेश्‍वर व सीना कोळेगाव प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. जायकवाडी प्रकल्पात २७ टक्के, येलदरी ५५ टक्के, माजलगाव १६ टक्के, मांजरा २३ टक्के, ऊर्ध्वपैनगंगा ४३ टक्के, निम्न तेरणा २८ टक्के, निम्न मणार ३२ टक्के, विष्णुपुरी ३९ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. १४ जुलैअखेर पर्यंतचा आढावा घेता गत तीन वर्षांतील

आजच्या तारखेत सर्वांत कमी उपलब्ध असलेला उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

मध्यम प्रकल्पांची संख्या व उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी

जिल्हा प्रकल्पसंख्या टक्केवारी

छ. संभाजीनगर १६ १८

जालना ७ २३

बीड १६ १९

लातूर ८ १५

धाराशिव १७ ११

नांदेड ९ २३

परभणी २ १

लघू प्रकल्पांची संख्या व उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी

जिल्हा प्रकल्पसंख्या टक्केवारी

छ. संभाजीनगर ९७ ८

जालना ५७ ६

बीड १२६ ८

लातूर १३४ १०

धाराशिव २०६ ७

नांदेड ८० २२

परभणी २२ ९

हिंगोली २७ २

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT