Water Crisis : ऐन पावसाळ्यात राज्यातील धरणं कोरडीच, केंद्रीय जल आयोगाचा रिपोर्ट प्रसिद्ध

Water Shortage : केंद्रीय जल आयोगाकडून देशभरातील प्रमुख धरणे आणि त्याची जलाशयांचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यामध्ये धरणक्षेत्रातील मोठी पर्जन्य तूट झाल्याने ३० जूनपर्यंत महाराष्ट्रातील अनेक धरणांतील पाणी पातळीची टक्केवारी फार कमी असल्याचे दिसून आहे.
Dam
DamAgrowon

Water Level in Dam : राज्यातील बहुतांशी भागात माॅन्सूनच्या पावसाने जोर धरला नाही. त्यात केंद्रीय जल आयोगाचा रिपोर्ट आला असून त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाढली आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख धरणांमधील पाण्याच्या पातळीत विशेष वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. या धरणामध्ये केवळ २१ टक्केच पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा ४ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे अनेक जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीला अडथळा निर्माण झाला आहे.

Dam
Rain Update :मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस

केंद्रीय जल आयोगाकडून देशभरातील प्रमुख १४६ धरणे आणि जलाशयांची रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात येतो. ३० जूनअखेरीस या धरणांमधील पाणीसाठा ६९ टक्के होता. महाराष्ट्रात मात्र ही टक्केवारी फार कमी असल्याचे दिसून येते. तसेच, २२ जूनला मागील आठवड्याच्या तुलनेत पावसाने चांगली हजेरी लावली असताना ३० जूनअखेरीस या साठ्यात फारशी वाढ झालेली नाही.

Dam
Dam Water Level : राज्यातील कोणत्या धरणात किती पाणी साठा आहे? | ॲग्रोवन

केंद्रीय जल आयोगाने रिपोर्ट केलेल्या देशभरातील प्रमुख जलाशयांमध्ये राज्यातील ३२ जलशयांचा समावेश होतो. त्यांमध्ये ३० जूनअखेरीस एकूण क्षमतेच्या २१ टक्के पाणीसाठा होता. हा आकडा मागील वर्षी याच कालावाधीत २५ टक्के होता. राज्यभरातील या जलाशयांची एकूण क्षमता १,९१६.६० कोटी घन मीटर इतकी आहे. त्या तुलनेत ती सध्या ४०६ कोटी घन मीटर इतकी भरली आहेत. मात्र १० वर्षांच्या सरासरीचा विचार केल्यास हा साठा क्षमतेच्या १ टक्का अधिक आहे.

या रिपोर्टमध्ये क्षमतेपेक्षा ८० टक्क्यांहून कमी पाणीसाठा व ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा, अशा श्रेणी करण्यात आल्या आहेत. ५० ते ८० टक्के पाणीसाठा असलेल्या जलाशयांमध्ये राज्यातील १० धरणे, तर ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा असलेली ९ धरणे आहेत. उजनी धरणात तर शून्य टक्के साठा आहे. कोयना धरणामध्य फक्त २८ टक्के पाणीसाठा आहे. तर जायकवाडी धरण ६७ टक्के पाणीसाठा आहे.

केंद्रीय जल आयोगाने धरणांच्या दृष्टीने कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे भाग केले आहेत. यांमध्ये सर्वाधिक २४ धरणे ही मध्य महाराष्ट्रात आहेत. चारही क्षेत्रांचा विचार केल्यास, ३० जूनपर्यंत धरणक्षेत्रात सरासरीच्या ५२.५ टक्के पाऊस कमी पडला होता. कोकणात (गोव्यासह) ४२३, मध्य महाराष्ट्रात ६३, मराठवाड्यात ४१ व विदर्भात ८८ मिमी सरासरी पाऊस धरणक्षेत्रात पडला. पर्जन्यमानाचा विचार केल्यास जायकवाडी, भंडारदरा, कोयना, भातसा, उरमोडी, कान्हेर, पानशेत, इसापूर, येल्दरी, पेंच व अप्पर वर्धा या धरणक्षेत्रातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

राज्यातील मोठ्या धरणांपैकी कोयना, भाटघर, तिल्लारी या धरणांवर जलविद्युतनिर्मिती होते. मात्र, या धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा असल्याने सध्या नाममात्र वीजनिर्मिती होत आहे. त्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक साठा झाला की जलविद्युतनिर्मिती वाढवली जाईल, असे प्रकल्प अभियंत्यांकडून सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com