Kolhapur Landslide Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Landslide : तर कोल्हापूर जिल्ह्यातही इर्शाळवाडीसारखी स्थिती होऊ शकते, तब्बल ७६ गावांना भुस्खलनाचा धोका

Team Agrowon

Kolhapur Landslide Alert : रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत भुस्खलन होऊन ४० ते ५० घरे दबली गेली. यामध्ये जवळपास १०० ते १५० लोक अडकले होते यातील सुमारे ९० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर १० जणांना आपला जीव गमवावा लागला. अद्यापही या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातही २०२१ साली ७६ गावांमध्ये भुस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. यामुळे या गावांना दरड प्रवण क्षेत्र घोषीत करण्यात आले. दरम्यान इर्शाळवाडीवर घडलेल्या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ७६ ठिकाणे धोकादायक असली तरी त्यातील मानवी वस्ती असलेली मोजकीच गावे आहे. याचबरोबर २०२१ साली अशा घटना घडल्या होत्या यावेळी या गावांना दरड प्रवण क्षेत्र घोषीत करण्यात आले होते. यामुळे अतिवृष्टी सुरू झाली की परिस्थिती बघून तेथील गावकऱ्यांना जवळचे सभागृह, समाज मंदिर, शाळांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात अशी माहिती संकपाळ यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यांना दरड कोसळण्याचा धोका आहे. यामध्ये सर्वाधिक राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, भुदरगड तालुक्यांना मोठा धोका असल्याची माहिती देण्यात आली.

शाहुवाडी तालुक्यातील घोलसवडे, पणुरे, कासार्डे, कांडवणपैकी आगलावेवाडी, माणपैकी - ठाणेवाडी, गेळवडे, पुसलें, लोलाणे, करंजफेण, मारळे, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शित्तूर वरुण, कडवेपैकी शिंदेवाडी, उखळू, पणुद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, उखळूपैकी अंबाईवाडी पैकी खोतवाडी, शिराळा मलकापूर धनगरवाडा अशी आहेत.

पन्हाळा तालुक्यामध्ये बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेटते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळुंगे अॅडव्हेंचर पार्क, आपटी.

करवीर तालुक्यातील महे, बोलोली, शिपेकरवाड एरिया, आमशी सातेरी, खुपिरे. गडहिंग्लज - चिंचेवाडी, सामानगड.

भुदरगड तालुक्यात मौजे डेलेपैकी भारमलवाडी, फये, भेंडेवेडी, बीजवडे, पडखांबेपैकी - खोतवाडी, पडखांबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कालवडेपैकी हारफोडेवाडी, टिक्केवाडी, मंदापूर

राधानगरी तालुक्यामध्ये कोणाली तर्फ असंडोली, पाटपन्हाळादरड, गैबीघाट, शिरगाव, सावतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोटेवाडी, केळोशी बुद्रुक, केळोशी खुर्द, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, माणबेट, चौके, राऊतवाडी, पणोरी, कासारपुतळे, पाल बुदूक पैकी मोहितेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धमालेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पांडेवाडी, सोळांकूर रामनगर,

कागल तालुक्यात बोळावी ठाणेवाडी, बेलेवाडी मासा, चिकोत्रा खोरे हासूर बुद्रुक, रांगोळी. आजरा वाजरे, खोतवाडी, पेरणोली, हारपेवाडी तर चंदगड तालुक्यातील एकमेव गंधारगड आहे. गगनबावडा तालुक्यात अणदूर रोड, कडवे रोड, मांडुकली, शेळोशी रोड, अशी ७६ गावे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT