Irshalwadi Landslide : माळीणची पुनरावृत्ती !, इर्शाळवाडीत रात्री भूस्खलन आणि होत्याचं नव्हतं झालं; घर ढिगाऱ्याखाली...

Raigad Landslide : दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळली. यात घर ढिगाऱ्याखाली गेल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
Raigad Landslide
Raigad Landslide Agrowon

Khalapur Irshalgad Landslide : रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरजवळील इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली. बुधवारी (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी (Irshalwadi) गाव भुईसपाट झाले आहे. या गावात 45 ते 50 घरांची वस्ती आहे, यातील 30 ते 40 घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Raigad Landslide
Monsoon Update : राज्यात पूढचे २४ तास अतिमहत्वाचे, अनेक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी

घटनेची माहिती मिळताच गावात NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. 25 ते 30 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, यातील काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, तर काहींचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण झालं होतं अशा परिस्थितीमध्ये गडावर जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Raigad Landslide
Rain Updates: भूस्खलन, पुरामुळे देशात १७ जणांचा मृत्यू

इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. तसेच सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अनेकजण जखमी झाले आहेत, तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मलब्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com