Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६९ टक्के पाऊस

Latest Rain Update : जिल्ह्यातील अनेक भागात आतापर्यंत अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्याचा परिणाम खरिपातील पेरण्यांवर होताना दिसत आहे. पेरण्या रखडल्या आहेत.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील अनेक भागात आतापर्यंत अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्याचा परिणाम खरिपातील पेरण्यांवर होताना दिसत आहे. पेरण्या रखडल्या आहेत. त्यातही जेथे पेरणी, अथवा कापसाची लागवड केली ती पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६९ टक्के पाऊस झाला आहे. राहुरी, श्रीरामपूरमध्ये कमी पाऊस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात १३ जुलैपर्यंत साधारणपणे सरासरी २३१ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत १६० मिलिमीटर म्हणजे ६९ टक्के पाऊस झाला आहे. यंदा मृगात पाऊस पडला नाही. पंधरा दिवसांनी उशिराने पाऊस आल्यामुळे पेरण्यांना अडचणी निर्माण झाल्या.

अजून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही. जिल्ह्यातील ९७ महसुलमंडलांपैकी २० मंडलांत अत्यंत कमी पाऊस आहे. शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, राहुरी, नगर, श्रीरामपूरमधील अनेक भागांत अजून पेरण्या, कापूस लागवडीला सुरवातच झाली नाही.

पिके जगविण्याची चिंता

उपलब्ध असलेल्या पाण्यावर व अल्प पावसावर काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र ती पिके जगविण्याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. पावसाला जसा उशीर होतोय, त्यानुसार खरिपातील पिकांचे वेळापत्रक कोलमडत आहे.

सरासरीच्या तुलनेत तालुकानिहाय पाऊस असा (टक्के)

नगर... ६०

पारनेर... ५२

श्रीगोंदा... ६२

कर्जत... ५४

जामखेड... ७१

शेवगाव... ८२

पाथर्डी... ८१

नेवासा... ८६

राहुरी... ३६

संगमनेर... ५०

अकोले... ८२

कोपरगाव... ७१

श्रीरामपूर... ४५

राहाता... ७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT