Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : राज्यात आतापर्यंत ६२ टक्के पेरण्या

Kharif Season 2023 : राज्याच्या १६७ तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून खरिपाच्या पेरण्या ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या १६७ तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून खरिपाच्या पेरण्या ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगामातील यंदा सरासरीइतका म्हणजेच १४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या अपेक्षित होत्या. परंतु, सोमवार (ता. १७) अखेर प्रत्यक्षात ८८ लाख ४४ हजार हेक्टरवर म्हणजेच ६२ टक्के पेरा झालेला आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, सद्यःस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कापूस व सोयाबीन या पिकाचा विचार करता या दोन्ही पिकाखालील असणाऱ्या क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ८३ टक्के पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

५८ तालुक्यांमध्ये अधिक पाऊस

एक जून ते १७ जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ३८९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा प्रत्यक्षात २७४ मिलिमीटर म्हणजे ७६ टक्के पाऊस पडलेला आहे. १७ जुलैपर्यंत ५२ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३६ तालुक्यामध्ये ५० ते ७५ टक्के तर १०९ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. केवळ ५८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

बियाण्यांचा पुरवठा पूर्ण

राज्यात खरिपासाठी १९.२१ लाख क्विंटल बियाणे लागते. यंदा २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी १९२१४४५ क्विंटल म्हणजेच १०० टक्के बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामाकरिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.

याशिवाय ४८.३४ लाख टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी २१.३१ लाख टन खतांची विक्री झालेली आहे. त्यामुळे राज्यात खताचा २७.०३ लाख टन साठा अजूनही उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT