Parbhani News : यंदाच्या खरिप हंगामात परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. १४)पर्यंत ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ३ लाख ३७ हजार २७७ हेक्टरवर (६३.०५ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी २ लाख ५३ हजार १७० हेक्टरवर (७०.१२ टक्के) पेरणी झाली आहे.
परंतु पावसाअभावी परभणी १ लाख ९७ हजार ६२२ हेक्टर (३६.९४ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८८४ हेक्टर (२९.८८ टक्के) असे मिळून एकूण ३ लाख ५ हजार ५०६ हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर राहिले आहे.
परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. १४) पर्यंत सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी १ लाख ६५ हजार १३५ हेक्टरवर (६६.१३ टक्के) पेरणी, तर कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ४४ हजार २४८ (७५.०५ टक्के) झाली आहे.
तुरीची १९ हजार ९७ हेक्टर(४१.५५ टक्के), मुगाची ६ हजार हेक्टर (२४.५७ टक्के), उडदाची ७९७ हेक्टरवर (८.७८ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ९३७ हेक्टर (१२.७८ टक्के), बाजरीची १११८ हेक्टर (१०.१ टक्के), मक्याची२४४ हेक्टर पेरणी झाली. एकूण गळितधान्यांची एकूण १ लाख ६५ हजार १४१ हेक्टर, कडधान्याची २६ हजार ५७१ हेक्टर, तृणधान्यांची १ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी झाली.
हिंगोलीत सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी १ लाख ९५ हजार ७६५ हेक्टर (७६.३५ टक्के) पेरणी झाली. एकूण गळीत धान्यांची १ लाख ९५ हजार ९४३ हेक्टर (७६.३९ टक्के) पेरणी झाली.
तुरीची २६ हजार हेक्टर (५९.२९टक्के), मुगाची ३ हजार ५९९ हेक्टर (४६.२५ टक्के), उडदाची ५ हजार पैकी २ हजार हेक्टर (३४.४६ टक्के), ज्वारीची २ हजार हेक्टर (४०.४० टक्के), बाजरीची ९७ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार पैकी २१ हजार ६५९ हेक्टर (५५.६४ टक्के) लागवड झाली. एकूण तृणधान्यांची २ हजार हेक्टर, कडधान्यांची ३२ हजार ८९५ हेक्टर, गळीत धान्यांची १ लाख ७६ हजार ८५१ हेक्टर पेरणी झाली.
तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी ९७००० ४२४९३ ४३.८१
जिंतूर ९७८८४ ६७००३ ६८.४५
सेलू ६०५३२ ४०५२३ ६६.९४
मानवत ४२५९९ ३०१९५ ७०.८८
पाथरी ४४९५० ३०८३८ ६८.६०
सोनपेठ ३५०३२ २६८८४ ७६.७४
गंगाखेड ५७८०७ ३८३१२ ६६.२८
पालम ४५६१६ ३०४३६ ६६.७२
पूर्णा ५३४७६ ३०५९२ ५७.२१
हिंगोली ७७१४४ ४८१३३ ६२.३९
कळमनुरी ६९१२१ .५१४७५ ७४.४७
वसमत ६३८७२ ३३३६० ५२.२३
औंढा नागनाथ ६५०१३ ५७.६० ७४.४७
सेनगाव ८५९०२ ६३१४२ ७३.५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.