पंतप्रधान नरेंद्र मोदी, PM Narendra Modi Agrowon
ताज्या बातम्या

5 G India : 5G मुळे गावागावांत क्रांती होणार ः नरेंद्र मोदी

देशात शनिवारपासून (ता. १) 5G इंटरनेट सेवा ही वेगवान पद्धतीने सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेला प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

नवी दिल्ली : देशात शनिवारपासून (ता. १) 5G इंटरनेट सेवा (Internet) ही वेगवान पद्धतीने सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेला प्रारंभ करण्यात आला. रिलायन्स जिओ (Relience Jio), एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचे उद्‌घाटन केले. या वेळी पंतप्रधानांसह दूरसंचारमंत्री आश्‍विनी वैष्णव, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी हेही उपस्थित होते.
भारतीयांना 5G च्या रूपाने ही अद्‌भुत भेट

भारतात 5G ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाहीय. ही सेवा म्हणजे, १३० कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आहेत. 5G सह भारत सब का डिजिटल साथ आणि सब का डिजिटल विकासाच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलेल. भारताने थोडी उशिरा सुरुवात केली असेल. परंतु आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले. मोदी म्हणाले, की आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून, भारताने आज नवा इतिहास रचला आहे. 5G मुळे गावागावांत क्रांती होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणात क्रांती झाली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तहसीलमध्ये 5G पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. जिओची 5G सेवा भारतात विकसित झाली आहे, त्यामुळे त्यावर आता आत्मनिर्भर भारतचा शिक्का नोंदवला गेला आहे. भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून, आम्ही जे काही दाखवले आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही नेतृत्व करण्यास तयार आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT