टीम ॲग्रोवन
दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे.
2023 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीपर्यंत रिलायन्स सर्व महानगरांमध्ये ही सेवा सुरू करू शकते.
5G मुळे तुम्ही काही सेकंदात मोबाइल डिव्हाइसवर उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ किंवा चित्रपट डाउनलोड करु शकता. 5G इंटरनेटचा वेग सध्याच्या वेगापेक्षा 10-12 पट जास्त असेल.
5G मध्ये दोन प्रकारच्या सेवा आहेत. स्टँडअलोन 5G आणि नॉन स्टँड अलोन. नॉन-स्टँड अलोन सेवा केवळ 4G संसाधनांद्वारे प्रदान केली जाईल आणि ती स्टँड अलोन 5G सेवेपेक्षा थोडी कमी असेल.
पण तरीही ती 4G पेक्षा खूप वेगवान असेल. तर स्टँडअलोनमध्ये स्वतंत्र संसाधने जोडली जातील. ही सेवा जलद आणि महाग असेल. सर्वप्रथम जिओ ही सेवा देणार आहे.
5 जी हे इंटरनेट सेवेतील Fifth Generation असेल. ५ जीचं नेटवर्क याआधीच्या २जी, ३जी, ४जी पेक्षा वेगवान असेल. म्हणजे ५ जीचा स्पीड ४ जीपेक्षा १० पट अधिक असेल.
५ जी इंटरनेट सेवा वापरण्यासाठी आपल्याला ५ जी मोबाईल असणं गरजेचं आहे.