Sugar Production
Sugar Production Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Production : सांगलीत ५५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Team Agrowon

सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यात ऊस गाळपाची (Sugarcane Crushing) गती वाढ वाढली आहे. १३ कारखान्याने ५० लाख टनांचे गाळप करून जवळपास ५५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे.

तर सरासरी साखर उतारा १०.९२ टक्के इतका आहे. गाळपात सांगलीच्या सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याने तर साखर उताऱ्यात कारंदवाडीच्या सर्वोदय कारखान्याने आघाडी घेतली आहे.

जिल्‍ह्यात सहकारी आणि खासगी असे अठरा साखर कारखाने आहेत. त्यापैकी १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील गाळप सुरू केले आहे. कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. १३ साखर कारखान्यांनी हंगाम जोरात सुरू केला आहे.

अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखान्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणीचे काटेकोर नियोजन केले आहे. सध्या शिवारात ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर केला जात असून मजुरांमार्फतही ऊस तोडणी सुरू आहे.

यंदाच्या हंगामात कवठे महांकाळचा महांकाली, आटपाडीचा माणगंगा, खानापूर तालुक्यातील नागेवाडीचा यशवंत शुगर, तुरचीचा साखर कारखाना हे चार साखर कारखाने सुरू झाले नाहीत.

त्यामुळे कवठे महांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिमाणी या दुष्काळी पट्ट्यातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना दुसऱ्या साखर कारखान्यांना विनवणी करावी लागत आहे.

कारखाना गाळप (टनांत) उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

दत्त इंडिया सांगली ६,७५,४८४ ७,२५,५४० १०.७४

राजाराम बापू साखराळे ४,९९,६१५ ५,३५,८०० १०.७२

विश्वास चिखली ३,८०,४९० ४,४८,५७० ११.७९

हुतात्मा वाळवा २,८३,३६० २,८१,६७५ ९.५४

राजाराम बापू वाटेगाव ३,०६,६४० ३,७१,३०० १२.११

राजारामबापू तीपेहळ्ळी २,१२,३६५ २,२५,३२० १०.६१

सोनहिरा वांगी ४,९९,९९० ५,८९,४२० ११.७९

क्रांती कुंडल ५,१६,०४० ५,३४,४१० १०.३६

सर्वोदय कारंदवाडी २,२८,८८० २,८१,७१० १२.३१

मोहनराव शिंदे आरग २,८५,२५० ३,१५,५०० ११.०६

दालमिया कोकरुड ३,१६,०६० ३,७६,१०० ११.०९

उदगिरी ३,४३,५०० ३,७३,४०० १०.८७

सद्गुरु राजेवाडी ४,४९,५६१ ३,९६,८३६ ८.८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT