Sugar Production : देशात साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा ओलांडला

अनुकूल हवामानामुळे देशात साखर हंगामाची गती या महिन्यात चांगलीच वाढली. यामुळे साखर उत्पादनही वेगात होत आहे. ३० डिसेंबरअखेर देशातील साखर उत्पादनाने शंभर लाख टनांचा आकडा ओलांडला आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

कोल्हापूर : अनुकूल हवामानामुळे देशात साखर हंगामाची (Sugar Season) गती या महिन्यात चांगलीच वाढली. यामुळे साखर उत्पादनही (Sugar Production) वेगात होत आहे. ३० डिसेंबरअखेर देशातील साखर उत्पादनाने शंभर लाख टनांचा आकडा ओलांडला आहे.

Sugar Production
Sugar Production : महाराष्ट्राची साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी

या कालावधी अखेर ४९८ साखर कारखान्यात १२८१.८२ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून ११९.३५ लाख टन साखर तयार झाली. उत्पादित साखरेपैकी महाराष्ट्रातील १८८ कारखान्यांतून ४६.२०लाख टन (४९९.४६ लाख टन गाळप), उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यातून ३१.३० लाख टन (३४७.७८ लाख टन गाळप) तर कर्नाटकातील ७२ कारखान्यातून २६ लाख टन (२६० लाख टन गाळप), साखरेचे उत्पादन झाले.

Sugar Production
Sugar Market : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा माहोल

२०२१-२२ ला देशातील ४९१ कारखान्यांतून ३५९.२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या वर्षात (२०२२-२३) साखर कारखान्यांची संख्या सातने वाढली आहे. ३० डिसेंबर २०२२ पर्यंत साखरेचे उत्पादन ३.६५ टक्क्यांनी वाढले आहे उसाच्या उताऱ्यात ०.०८ टक्के घट आहे.

Sugar Production
Sugar Export : देशातील १४९ कारखान्यांकडून कोटा अदलाबदलीचे करार

हंगामाअखेर महाराष्ट्रातील १८८ कारखान्यातून १३४ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज असून त्याखालोखाल उत्तरप्रदेशातील १२० कारखान्यातून १०४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. कर्नाटकातील ७२ कारखान्यात गाळप चालू असून त्यातून ६० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या तीन राज्यांशिवाय तमिळनाडूत १४ लाख टन तर गुजरातमध्ये १२ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अपेक्षित आहे.

सध्या देशभर थंडीचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात आहे. थंडीचा फायदा उसाचा उतारा वाढण्यास होतो. देशातील ऊस उत्पादक प्रदेशांमध्ये सतत थंडी नाही. कधी ढगाळ हवामान, कधी कडक ऊन तर काही दिवस थंडी असे संमिश्र हवामान असल्याने उताऱ्यात वाढ झाली नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात थंडीचे प्रमाण वाढल्यास उतारा काही प्रमाणात वाढू शकतो, असे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

२०२२-२३ या वर्षी देशभरात ३५७ लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित असून त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश कर्नाटक हे तीन राज्ये आघाडीवर राहतील, असा अंदाज आहे.

- प्रकाश नाईकनवरे,

व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com