Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : खरिपासाठी मराठवाड्यात ४८.४० लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील वहितीखालील क्षेत्र ५४.७६ लाख हेक्टर असून खरिपाचे क्षेत्र ४७.८७ लाख हेक्टर आहे.

Team Agrowon

Maharashtra Agriculture News : मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील वहितीखालील क्षेत्र ५४.७६ लाख हेक्टर असून खरिपाचे क्षेत्र ४७.८७ लाख हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ साठी ४८.४० लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी (ता.२९) घेतलेल्या आढावा बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी नियोजनाची, प्रस्तावित क्षेत्राची माहिती देण्यात आली.

त्यानुसार कापूस १३.९१ लाख हेक्टर, सोयाबीन २४.८६ लाख हेक्टर, तूर ४.४४ लाख हेक्टर, मका २.३१ लाख हेक्टर असे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

असे आहे बियाणे नियोजन...

कापूस प्रस्तावित क्षेत्र १३.९१ लाख हेक्टरसाठी ६३.०२ लाख पाकिटांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सोयाबीन क्षेत्र २४.८६ लाख हेक्टर असून सोयाबीन गरज ३५ टक्के बियाणे बदल दरानुसार ६.२५ लाख क्विंटल असून त्याप्रमाणे महाबिजद्वारे १.९१ लाख क्विंटल व खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ४.३४ लाख क्विंटल बियाणेची मागणी नोंदविण्यात आली आहे.

महाबिजद्वारे ६७ हजार ९५ क्विंटल आवंटन मंजूर आहे.सोयाबिन प्रस्तावित लागवडी क्षेत्रानुसार १८.६५ लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे.

ग्रामबिजोत्पादनव्दारे २४.६३ क्विंटल सोयाबिन बियाणे गावपातळीवर शेतकऱ्यांकड़े जतन करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबिन बियाणे पुरवठा कमी झाला तरी शेतकऱ्यांकडे स्वतःचे बियाणे असल्याने टंचाई भासणार नाही.

असे आहे खतांचे नियोजन

खतांचे मंजूर आवंटन- १२.३७ लाख टन आहे. ३१ मार्च २०२३ अखेर ६.४४ लाख टन शिल्लक आहे. मागील हंगामातील शिल्लक साठ्यासह एकूण ७.१७ लाख टन (५८ टक्के) विभागात खतसाठा उपलब्ध असून हंगामात खतांची टंचाई भासणार नाही. प्रत्येक कंपनीचे पीकनिहाय, तालुकानिहाय संनियंत्रण करण्यात येऊन खत वितरणाचे नियोजन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Barshi APMC Election: बार्शी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु

Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

Cotton Harvest Wage: कापूस वेचणी मजुरी दर पोहोचला ११ रुपये किलोवर

Farmer Issues: जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या रेशीम शेतकऱ्यांच्या अडचणी

Ativrushti Nuksan: अतिवृष्टीने मोठे नुकसान; दिवाळी सुनी..सुनी

SCROLL FOR NEXT