Kharif Season : खरिपासाठी ८ हजार १०० क्विंटल भातबियाण्यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात ५५ ते ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड केली जाते. यामध्ये संकरित, सुधारित आणि काही प्रमाणात पांरपरिक बियाण्यांचीदेखील लागवड केली जाते.
Rice
Rice Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : खरीप हंगामाकरिता (Kharif Season) जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ८ हजार १०० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली असून ११ हजार ५२० टन खतांची मागणी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात ५५ ते ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड केली जाते. यामध्ये संकरित, सुधारित आणि काही प्रमाणात पांरपरिक बियाण्यांचीदेखील लागवड केली जाते.

या वर्षाच्या खरीप हंगामाकरिता जिल्हा परिषद कृषी विभागाने ८ हजार १०० क्विंटल भात बियाण्यांची मागणी केली आहे.

Rice
Sugarcane Labor : ऊसतोड मजुरांना कायदेशीर संरक्षण द्या

गेल्यावर्षीच्या तुलनेत १ हजार ७१८ क्विंटल बियाणे अधिक मागविण्यात आले आहे. भात बियाण्यांमध्ये प्रामुख्याने अंकुर सोनम, शुभांगी, प्रसन्न, जय श्रीराम गोल्ड, अंकुर, रूपाली, सुवर्णा, जया, मसुरी, रोशन, गायत्री, सगुणा, पवनपुत्रा, अस्मिता, दीपरेखा, रत्नागरी, कर्जत, सह्याद्री, कोमल, सोना, मनाली, कावेरी या बियाण्यांचा समावेश आहे.

याशिवाय कृषी विभागाने ११ हजार ५२० टन खतांची मागणी केली आहे. यामध्ये ५ हजार ८४० टन युरिया, डीएपी ५५० टन, एमओपी-३९० टन, एनपीके-३४०० टन, एसएसपी १ हजार ३४० टन या खतांचा समावेश आहे.

खरीप हंगाम पूर्वतयारीच्या दृष्टीने कृषी विभागाने पावले उचलली असून शेतकऱ्यांनी अधिकाधिक सेंद्रिय खतांचा वापर करावा, बोगस खत व भात बियाणे विक्रीपासून दक्षता बाळगावी.
विरेश अंधारी, कृषी विकास अधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com