Electricity Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Chikotra Dam Power Generation : ‘चिकोत्रा’तून ४१ लाख युनिट वीजनिर्मिती

Electricity Generation : प्रथमच ४१ लाख युनिट वीज निर्मितीचा टप्पा गाठला. पावसाच्या जादा प्रमाणासह अन्य कारणांमुळे जनित्रातून जास्त पाणी गेल्याने यंदा वीज निर्मिती जादा झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा प्रकल्पावरील वीजनिर्मिती प्रकल्पात सात वर्षांत पहिल्यांदा टार्गेट पूर्ण झाले. प्रथमच ४१ लाख युनिट वीज निर्मितीचा टप्पा गाठला. पावसाच्या जादा प्रमाणासह अन्य कारणांमुळे जनित्रातून जास्त पाणी गेल्याने यंदा वीज निर्मिती जादा झाली आहे.

चिकोत्रा खोऱ्यातील कोरडवाहू शेती आणि सुमारे ३२ गावांतील पिण्याच्या पाण्याची सोय करणारा चिकोत्रा प्रकल्प येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा आहे. या प्रकल्पाशिवाय दुसरा पाण्याचा स्त्रोतच नसल्याने मॉन्सून सुरू झाल्यापासून ते मे महिन्यातील शेवटच्या आवर्तनापर्यंत पाणी साठा किती, याची विचारणा होत असते.

अनेकदा पाण्याची आवर्तने, उपसाबंदी यातून संवेदनशील प्रश्‍नही तयार झाले. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे या प्रकल्पात आता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले आहे. मॉन्सूनपूर्व आता शेतीला पाणी मिळणार नाही.

प्रत्येक आवर्तनावेळी प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून वीज निर्मिती केली जाते. १५ मार्च २०१७ पासून हा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. दरवर्षी ४१ लाख २८ हजार युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे, मात्र ते यावर्षी प्रथमच पूर्ण झाले आहे.

वीजनिर्मिती(युनिटमध्ये)

२०१६-१७ (१८ हजार ४६८)

२०१७-१८ (१२ लाख ९२ हजार ६००)

२०१८-१९ (२३ लाख ७३ हजार)

२०१९-२० (४० लाख ३० हजार)

२०२०-२१ (३२ लाख ७६ हजार ६६०)

२०२१-२२ (३३ लाख ५८ हजार ३७०)

२०२२-२३ (४१ लाख ३२ हजार ३५५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women International Year 2026: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष केवळ उत्सव की खरी मान्यता?

Interview with Dr Sanjay Kolte: साखर उद्योग बळकट करण्यासाठी प्रयत्न

Duck Farming: येरुकला : बदकपालन करणारा भटका समाज

Rural Employment: ऊस पाचटापासून मूल्यवर्धनासह रोजगार निर्मिती

Women Enterpreneurship: शेतमजूर ते प्रक्रिया उद्योजिकेपर्यंतचा प्रवास

SCROLL FOR NEXT