Women International Year 2026: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष केवळ उत्सव की खरी मान्यता?
Women in Agriculture: सन २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित झाले आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या हिताची धोरणनीती आखणे, जमिनींचे अधिकार त्यांच्या नावे करणे, हिंसाचाराला आळा घालणे यासह महिलांचे संघटन आणि त्यांचे नेतृत्व या बाबींना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे वर्ष केवळ उत्सव म्हणून न राहता महिलांना शेतकरी म्हणून मिळालेली ती खरी मान्यता असेल.