onion agrowon
ताज्या बातम्या

Onion Producers : ...तर कांदा उत्पादकांचे ४० टक्के नुकसान टळले असते

पिंपळगाव बसवंत येथे आमदार रोहित पवार यांचा शेतकऱ्यांशी संवाद

टीम ॲग्रोवन

जि. नाशिक : शेतीचा खर्च दुप्पटीने वाढल्याने शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही शिल्लक राहत नाही. कृषी निविष्ठा कंपन्यांचे शेअर दोनशे पटीने वाढले. पण शेतीमालाचे दर थोडेही वधारले तरी मोठी चर्चा होते. आज कांद्याला मिळणारा दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव चार (Onion Rate) महिन्यांपूर्वीच मिळाला असता तर साठवणुकीत झालेले ४० टक्क्यांचे नुकसान टळले असते, असे मत राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मांडले.

आमदार पवार हे मंगळवारी (ता. ११) एकदिवसीय जिल्हा दौऱ्यावर होते. पिंपळगाव बाजार समितीत शेतीमालाच्या लिलावाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार दिलीप बनकर, गणेश बनकर, सोहनलाल भंडारी, माजी सरपंच महेंद्र गांगुर्डे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की आता चार महिने साठवणूक केलेल्या कांद्याचे भाव वाढले, पण यात केंद्र किंवा राज्य सरकारचे श्रेय नाही. उत्पादनात ४० टक्के घट होऊन मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारभावात सुधारणा झाली आहे. ‘नाफेड’ने खरेदी केलेल्या ठिकाणीच कांदा विकत असेल तर शेतकऱ्यासाठी ही संस्था कुचकामी आहे. पिकते तेथे खरेदी करून विकते तेथे शेतीमाल पाठवायला हवा, असे स्पष्ट केले. आमदार बनकर यांनी शरद पवार यांच्याकडे कांद्याच्या बाजारभावाबाबत प्रश्‍न मांडला. तेव्हा पवार यांनी केंद्र व राज्य सरकारला दोन लाख टन कांदा खरेदी करण्यास भाग पाडल्याचे त्यांनी नमूद केले.

‘शेतकरी संस्थांना प्रोत्साहन द्यायला हवे’

पवार म्हणाले,की आमदार बनकर यांनी पिंपळगाव बाजार समितीने पारदर्शक कामकाजाच्या बळावर शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. शेतकरी केंद्रबिंदू मानणाऱ्या पिंपळगाव बाजार समिती सारख्या संस्थांना शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेची कामकाज इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या वेळी बाजार समितीतर्फे ‘शिवभोजन थाळी’च्या धर्तीवर अवघ्या दहा रुपयांत मिळणाऱ्या ‘किसान भोजन थाळी’ची चव चाखली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT