Cashew Crop Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Crop : मडुरा बाबरवाडीत आगीत काजूची ४० झाडे जळाली

आगीत बागायतदार शरद रेडकर यांच्या काजू बागेतील ४० हून अधिक उत्पादनक्षम झाडे जळाली.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील मडुरा बाबरवाडी (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत बागायतदार शरद रेडकर यांच्या काजू बागेतील (Cashew Orchard) ४० हून अधिक उत्पादनक्षम झाडे जळाली. (Cashew Tree Burnt In Fire) ही घटना शुक्रवारी (ता.२७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मडुरा बाबरवाडी येथील माळरानावर आग लागली. जोरदार वारा आणि सुकलेल्या गवतामुळे आगीचा क्षणार्धात भडका उडाला. ही आग वेगाने शरद रेडकर यांच्या बागेत घुसली.

आग दिसताच बागेत काम करीत असलेले नितीन धुरी, अभिमन्यू धुरी हे तत्काळ बागेजवळ पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ शरद रेडकर, श्यामल रेडकर, गुरू रेडकर हे देखील तेथे पोहोचले.

त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर आग पूर्णतः विझविण्यापूर्वी रेडकर यांच्या बागेतील ४० झाडे जळाली.

मात्र आग विझविल्यामुळे लगत असलेल्या ५० एकरांवरील काजू बागांचे नुकसान टळले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या आगीत १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सध्या गावोगावी वणवे लागत आहेत. डिसेंबर महिन्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश माळरानावरील गवत पूर्णतः सुकून जाते. त्यामुळे या वेळी आग लागण्याच्या घटना घडत असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT