Cashew Orchard : काजू बागांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू मोहोर काळवंडला होता. या संदर्भातील बातमी ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर आता कृषी अधिकाऱ्यांकडून काजू बागांच्या बांधावर पोहोचले असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबत किती टक्के मोहोर वाया केला याचे सर्व्हेक्षण करीत आहेत.
 Cashew Orchard
Cashew Orchard Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू मोहोर काळवंडला होता. या संदर्भातील बातमी ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर आता कृषी अधिकाऱ्यांकडून काजू बागांच्या बांधावर पोहोचले असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबत किती टक्के मोहोर वाया केला याचे सर्व्हेक्षण करीत आहेत.

 Cashew Orchard
Mango, Cashew : आंबा, काजू पीक मोहर लांबणीवर

नोव्हेंबरअखेर आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागांत सलग तीन-चार दिवस अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाने सलग चार दिवस पावसाचा अंदाज दिल्यामुळे काजू बागायतदारांनी काजूवर फवारणी करणेदेखील टाळले. हा पाऊस सायंकाळी उशिरा आणि रात्री पडल्यामुळे रात्रभर मोहोरांवर पावसाचे पाणी टिकून राहिले, त्यामुळे अनेक बागायतदारांच्या झाडांचा मोहोर कुजला.

 Cashew Orchard
Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

काही शेतकऱ्यांचा झाडांचा मोहोर काळा पडला. पालवीवर देखील कीड-रोगांचा प्रादुर्भाव जाणवला. मात्र कृषी विभाग सुशेगाद होता. कृषी विभागाचा कुणीही अधिकाऱ्यांनी काजू मोहोर नुकसानीची पाहणी केली नव्हती किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केलेले नव्हते. परंतु ‘ॲग्रोवन’ने अवकाळीमुळे काजू काळवंडला या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले.

या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने काजू बागांची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून अधिकतर अवकाळी पाऊस झालेल्या वैभववाडी तालुक्यातील काजू बागांची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. अवकाळीमुळे काही काजूची फळे काळपट झाल्याचे अधिकाऱ्यांना पाहायला मिळत आहे. याशिवाय मोहोर किती टक्के काळवंडला याचे सर्व्हेक्षण देखील हे अधिकारी करीत असून, या संदर्भातील अहवाल ते वरिष्ठांना देणार
आहेत.

काजूचा मोहोर, काळी पडलेली काजू बी यांचे छायाचित्र वेंगुर्ला फळसंशोधन
केंद्रांकडे पाठविले आहे. त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
- सचिन कांबळे,
तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com