Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Tanker Water Supply : महाडमध्ये ३७ गाव-वाड्यांना टँकरची प्रतीक्षा

उन्हाची तीव्रता वाढल्‍याने महाडमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

Team Agrowon

Mahad News : उन्हाची तीव्रता वाढल्‍याने महाडमध्ये पाणीटंचाईच्या (Water Shortage) झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यासाठी टँकर पाणीपुरवठा व विंधन विहिरी खोदाई करिता ६६ लाख ३० हजार रुपयांचा टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पंचायत समितीकडून ३७ गाव-वाड्यांत टँकर पाणीपुरवठा सुरू करण्यासाठीचा प्रस्‍ताव तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे.

महाड तालुक्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते, परंतु तरीही उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. हा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटतात आणि त्यामुळे गाव-वाड्यांत तीव्र पाणीटंचाई भासते.

महाड पंचायत समितीकडून या वर्षी टंचाई निवारण आराखडाही तयार केला आहे. ३१ गावे व १२५ वाड्यांमधील संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ५४ लाख ६० हजार रुपये टंचाई निवारण आराखडातून मंजूर करण्यात आले आहेत. तसेच काही वाड्यांवर तातडीने विंधन विहिरी खोदाईही करण्यात येणार आहे. त्यानुसार अकरा वाड्या व दोन गावांना विंधन विहिरीत खोदल्या जाणार आहेत.

डगावतर्फे तुडील, देवघर, मोहोत कोंड, कोतुर्डे सोनारकोंड, किंजळोली बु, वाघोली आदिवासी वाडी, दहिवड आदिवासी वाडी, गारपाटले व आमडोशी या ठिकाणांचा यात समावेश आहे. याकरिता ११ लाख ७० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्‍ताव सादर

तालुक्यातील अनेक गावांची टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आली असून महाड पंचायत समितीकडून तीन गावे व ३७ वाड्या करता पाणीपुरवठा केला जावा, यासाठी महाड तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहेत.

पिंपळकोंड, सापे गोवेले व शेवते या गावांसाठी तसेच कुंभार्डे धनगरवाडी, ताम्हाणे धनगरवाडी, कावळे तर्फे विन्हेर धनगरवाडी, निगडे गावाच्या सात वाड्या, नातोंडी गावाच्या सहा वाड्या, तसेच शेवतेच्या पाच वाड्या अशा संपूर्ण ३७ ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाड पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यासंबंधीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. ते पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहेत. लवकरच टंचाईग्रस्‍त गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल.
- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार, महाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mixed Cropping Model : अल्पभूधारकांसाठी ठरतेय मिश्र पीक पद्धती फायदेशीर

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून मिळाली शाश्‍वती

Livestock Management: उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य

Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

SCROLL FOR NEXT