Nanded News: ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा’साठी हा उपक्रम शेतकरी-शास्त्रज्ञ यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारा आहे. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून शेती अधिक फायदेशीर व शाश्वत होण्यास मदत होईल, असा विश्वास नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला..वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्र, नांदेडच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत जैविक निविष्ठा निर्मिती व वापर याबाबत राबविण्यात येत असलेल्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत किसान गोष्टी या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. १४) सायाळ येथे करण्यात आले होते..Agriculture Innovation: काळानुरूप नवीन वाण, तंत्रज्ञान वापर, मार्केटिंगसह नव्या संधींचा शोध गरजेचा.यात अन्नदाता सुखी भव शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देण्यात आली. यावेळी टरबूज, ज्वारी, हरभरा आदी पिकांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. .Agriculture Innovation: अमेरिकेतील फळबागेत ‘पीक युवर ओन’ उपक्रम.या कार्यक्रमाला कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे तसेच शास्त्रज्ञ डॉ. पवण डोके हे उपस्थित होते. शास्त्रज्ञांनी पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापन, एकात्मिक कीड नियंत्रण, जैविक व सेंद्रिय उपाययोजना, खत व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर तसेच उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेती कशी साध्य करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले..टरबूज पिकामधील रसशोषक किडी, हरभरा पिकावरील अळी व्यवस्थापन तसेच ज्वारी पिकातील रोग नियंत्रण यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी रत्नाकर पाटील, महादेव पाटील, केशव पाटील, भुजंग पाटील, हरिश्चंद्र पाटील, निवृत्ती पाटील, रामकृष्ण बशेश्वर भालके, एकनाथ ढगे, उत्तम ढगे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.