Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि कोल्हापूर महापालिकांसाठी गुरुवारी (ता. १५) चुरशीने मतदान झाले. सकाळी साडेसातपासून अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. एक-दोन ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड वगळता दुपारी साडेतीनपर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५० टक्के तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी ४६ टक्के मतदान झाले होते..कोल्हापुरात ३२७ तर इतर म्हणजे २७० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शुक्रवारी (ता. १६) सकाळी आठपासून निकालास प्रारंभ होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्येच प्रमुख लढत होत आहे..Local Body Election: ‘झेडपी’, पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकारण तापणार.गुरुवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर लागलेल्या मतदारांच्या रांगा, महिला व तरुणाईचा उत्साह, उमेदवारांची मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली धावपळ असे चित्र कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकांच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ते इर्षेने मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. चौका-चौकात उमेदवारांचे लागलेले बूथ व त्यावरील कार्यकर्त्यांची लगबग दिसत होती.मतदार यादीत नाव नाही, मोबाइल ठेवायचा कोठे, या कारणावरून वादा-वादीचे प्रसंग घडले..Local Body Election: गोंधळात मतांचा टक्का घसरण्याची भीती.महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसल्याचे दिसून आले. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते सकाळपासूनच मतदान केंद्रांवर हजेरी लावून होते. संवेदनशील केंद्रांवर उमेदवारासह त्याचे कुटुंबातील सदस्य सातत्याने फिरत होते. हक्काचे मतदार आणण्यासाठी तीन चाकी, चार चाकी गाड्यांची सोय केली होती. त्यावर जास्वंदीचे फुल, तिरंगा अशा सांकेतिक खुणा केल्या होत्या. दिव्यांग बांधवांनी मतदानाचा अधिकार बजावला. विशेषत: महिला व तरुणाई मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडण्याचे दिसून आले. दुपारी बारापर्यंत सर्व मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसत होते. केंद्रापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर वाहनांचे पार्किंग करून मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करावा,.असे आवाहन पोलिस यंत्रणेतर्फे करण्यात येत होते.तसेच मतदान झालेल्या मतदारांनी केंद्रांवर थांबू नये, असे सांगण्यात येत होते. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, भाजप खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. इचलकरंजीत आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे यांनी मतदानाचा अधिकार बजावला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.