Poultry  Agrowon
ताज्या बातम्या

Poultry : बिबट्याच्या हल्ल्यात ३५० कोंबड्यांचा मृत्यू

सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीवर शनिवारी (ता. १९) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुक्कुटपालक शेतकरी भास्कर अहिरे यांच्या पोल्ट्री फार्ममधील अंदाजे साडेतीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला.

Team Agrowon

किकवारी बुद्रुक, ता. सटाणा : सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीवर शनिवारी (ता. १९) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुक्कुटपालक (Poultry) शेतकरी भास्कर अहिरे यांच्या पोल्ट्री फार्ममधील अंदाजे साडेतीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला. या घटनेत सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीलगत अहिरे यांचे शेत आहे. गट नंबर.२५१ मध्ये त्यांचे पोल्ट्री फार्मचे शेड असून, पाच हजार कोंबड्याचे संगोपन ते करत आहेत. शनिवारी रात्री बिबट्याने पोल्ट्री शेडची जाळी वाकवून तीनशे ते साडेतीनशे कोंबड्यांना लक्ष्य केले.

भास्कर अहिरे पहाटे कोंबड्यांना खाद्य टाकायला गेले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असून, शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर निघणेही अवघड झाले आहे. वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी भास्कर अहिरे व शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT