Gram Panchayat Fundq Agrowon
ताज्या बातम्या

Government Fund : ३१४ कोटींचा निधी वापराविना पडून

Gram Panchayat Fund : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील बंधित निधीतून देखील कामे पूर्णत्वास जातानाचे चित्र ग्रामीण भागात नाही. या निधीतील ६० टक्के निधी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी वापरणे बंधनकारक आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील १ हजार ३८५ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांमध्ये ३१४ कोटी ६५ लाख ३० हजार ४११ रुपयांचा निधी वापराविना पडून आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींकडे सरासरी सरासरी २२ लाख ७१ हजार ८६३ रुपये आहेत. ग्रामपंचायतींना वित्त आयोगाच्या निधीचा शेवटचा हप्ता मार्च महिन्यात मिळाला. एवढा निधी शिल्लक असताना गावांमध्ये विकास कामे गतीने होत नसल्याची स्थिती आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील बंधित निधीतून देखील कामे पूर्णत्वास जातानाचे चित्र ग्रामीण भागात नाही. या निधीतील ६० टक्के निधी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी वापरणे बंधनकारक आहे. मात्र घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामे देखील हात नसल्याचे वास्तव आहे.

या व्यतिरिक्त, प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ भारत मिशनकडून अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील ४०० हून अधिक ग्रामपंचायतींनी यासंदर्भात कामे पूर्ण देखील केली आहेत.

ग्रामपंचायतींनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी वापरला तर नव्याने निधी प्राप्त होईल. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना अंगणवाड्या सुधारण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यातून जवळपास ४ हजार अंगणवाड्यांचे कामे पूर्ण होऊ शकतात, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

२०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विकास आराखडे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी मंजूर करून अपलोड केले. यापूर्वी दिलेला निधी वापरला जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतींना निधी मिळणार नाही. सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या रहिवाशांच्या कल्याणासाठी उपलब्ध निधीचा कार्यक्षम आणि नियमानुसार वापर करून विकास योजनांची त्वरित अंमलबजावणी करावी.
- आयुष प्रसाद, प्रशासक, जिल्हा परिषद, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT