Digital Gram Panchayat : बोरीस-गुंजीस ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार

ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, नागरिकांचा बऱ्याच गोष्टी घरबसल्या मिळाव्यात, या उद्देशातून स्‍थानिक प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
Grampanchyat News
Grampanchyat NewsAgrowon
Published on
Updated on

Alibag Grampanchyat News : तालुक्यातील बोरीस-गुंजीस ग्रुपग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा ( Digital Technology) अवलंब करीत घरक्रमांकाऐवजी ‘क्यूआर कोड’द्वारे करवसुली (Tax Recovery) करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावलेल्या क्यूआर कोडद्वारे (QR Code) घरपट्टी व पाणीपट्टी (Water Tax)भरणा केला जाणार आहे. कर भरण्यासाठी क्‍यूआर कोड प्रणाली राबवणारी बोरीस-गुंजीस ग्रामपंचायत राज्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, नागरिकांचा बऱ्याच गोष्टी घरबसल्या मिळाव्यात, या उद्देशातून स्‍थानिक प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकसित केलेल्या अमृतग्राम डिजिटल करप्रणालीचा ग्रामपंचायतीने अवलंब केला आहे.

Grampanchyat News
Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

सोमवार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, ग्रामपंचायतीच्या सरपंच सदिच्छा पाटील यांच्या हस्ते अनौपचारिक ऑनलाईन करवसुली प्रणालीच्या क्यूआर कोडचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी उपसरपंच मोहिनी वेंगुर्लेकर, ग्रामसेविका कविता काळे, सदस्य धवल राऊत, सदस्या सानिका म्हात्रे, रेखा म्हात्रे, सुप्रिया नारकर, सदस्य हेमंत पडते, सदस्य रवींद्र बेर्डे उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेने अमृतग्राम डिजिटल करप्रणाली विकसित केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, ग्रामविस्तार अधिकारी डी.एल. साळावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com