Rabi Jowar Agrowon
ताज्या बातम्या

Jowar Sowing : पुणे जिल्ह्यात ज्वारीची २७ टक्के पेरणी

परतीच्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने ज्वारीच्या पेरण्या चांगल्याच खोळंबल्या होत्या. उशिरा काही प्रमाणात वाफसा झाल्याने ज्वारीच्या बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः परतीच्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने ज्वारीच्या पेरण्या (Jowar Sowing) चांगल्याच खोळंबल्या होत्या. उशिरा काही प्रमाणात वाफसा झाल्याने ज्वारीच्या बऱ्यापैकी पेरण्या (Sowing) झाल्या आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख ३४ हजार ३३६ हेक्टरपैकी ३५ हजार ९०७ हेक्टर म्हणजेच २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

यंदा चांगल्या पावसामुळे ज्वारी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. ज्वारीच्या पेरणीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरणी केली. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर, खेड, शिरूर ही तालुके ज्वारीच्या पिकांसाठी ओळखली जात असून जिल्ह्यात बारामती तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. सुमारे १४ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ शिरूर, पुरंदर, खेड या तालुक्यांत पेरणी झाली आहे. तर, पश्चिमेकडील भोर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजेच ४१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली पेरणी

तालुका पेरणी क्षेत्र

हवेली १३३

भोर ४१६

जुन्नर ९३६

खेड ३०२३

आंबेगाव १०६६

शिरूर ५९६८

बारामती १४,२००

इंदापूर १३८७

दौंड १४५०

पुरंदर ७३२८

पावसामुळे अनेक ठिकाणी ओल कायम राहिल्याने वेळेवर पेरण्या झाल्या नाहीत. जशी ओल कमी झाली त्यानुसार पेरण्या केल्या आहेत. येत्या काळात ज्वारीच्या पेरण्या वाढतील, अशी अपेक्षा आहे.
सुभाष काटकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Farmer Schemes: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार कमी कागदपत्रे ! डीबीटी पोर्टलवरील २१ योजनांचे डिजिटल सुसूत्रीकरण

Marigold Price: दसऱ्यात झेंडूचा रंग पडला फिका; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा!

Maharashtra Rain Prediction: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत १५ जागा बिनविरोध, ६ जागांसाठी १३ जण रिंगणात, पडळकर विरुद्ध पवार लढत

Market Committee Rule: बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांच्या चढ-उतारावर बंदी; माथाडी कामगारांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT