Rabi Jowar : ठिबक सिंचनामुळे मिळते रब्बी ज्वारीमध्ये उत्पादनवाढ

महाराष्ट्रामध्ये रब्बी ज्वारीची लागवड ३४ ते ३५ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यापासून २४.९ लाख टन उत्पादन मिळत असले तरी सरासरी उत्पादकता कमी (म्हणजे हेक्टरी ६ ते ७ क्विंटल) आहे. रब्बी ज्वारीस त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे खरीप ज्वारीपेक्षा जास्त दर मिळतो.
Rabi Jowar
Rabi JowarAgrowon
Published on
Updated on

डॉ. उदय खोडके, डॉ. सुरेश आंबेकर, ऋषीकेश औंढेकर

महाराष्ट्रामध्ये रब्बी (Rabbi ) ज्वारीची लागवड (Jowar Cultivation) ३४ ते ३५ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यापासून २४.९ लाख टन उत्पादन (Jowar Cultivation) मिळत असले तरी सरासरी उत्पादकता कमी (म्हणजे हेक्टरी ६ ते ७ क्विंटल) आहे. रब्बी ज्वारीस त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे खरीप ज्वारीपेक्षा जास्त दर मिळतो.

कारण रब्बी ज्वारीच्या दाण्याची व कडब्याची उत्तम प्रत हे होय. भविष्यातील अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ज्वारी पिकासारख्या कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकाचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. त्यातही काटेकोर पाणी वापराच्या दृष्टीने ठिबक सिंचनावर ज्वारी पीक घेण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

Rabi Jowar
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

रब्बी ज्वारीसाठी पाणी व्यवस्थापन

कमी पर्जन्यमान असणाऱ्या भागात ओलावा संवर्धन व पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक असतो. सद्यःस्थितीमध्ये पावसाचा अनियमितपणा वाढला आहे. भूजल पातळीही कमी झाली आहे. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादन कमी येते. त्यामुळे शक्य असल्यास संरक्षित पाण्याचा वापर उपयोगी ठरतो.

पाण्याची गरज असलेल्या वाढीच्या चार संवेदनशील अवस्था ः पिकाच्या जामदार वाढीचा काळ (२५-३० दिवस), पीक पोटऱ्यात येण्याची वेळ (५०-५५ दिवस), फुलोरा येणे (७०-७५ दिवस) आणि कणसात दाणे भरण्याचा काळ (९०-१०० दिवस).

Rabi Jowar
Agrowon Kharif Scheme : ‘ॲग्रोवन समृद्ध खरीप योजने’च्या पाचव्या बक्षिसाचे विजेते

या वेळी जमिनीत ओलावा नसल्यास किंवा पाऊस न आल्यास प्रवाही सिंचनाद्वारे पेरणीनंतर एक व इतर २ ते ३ सिंचन पाळ्या द्याव्यात. मात्र पाणी कमी असताना प्रवाही सिंचन शक्य होत नाही. कारण त्यात पाण्याचा भरपूर वापर होऊनही जमिनीत कायम वाफसा राहत नाही. पर्यायाने ज्वारीकडून अन्नद्रव्यांचे योग्य शोषण होत नाही.

सिंचन पाण्याच्या काटेकोर वापराच्या दृष्टीने परभणी विद्यापीठातील पाणी व्यवस्थापन योजना, हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथील ज्वारी संशोधन संचालनालय आणि भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील पाणी व्यवस्थापन संचालनालय या संस्था गेल्या तीन वर्षांपासून अभ्यास आणि संशोधन करत आहेत.

ठिबक सिंचन संचाचा वापर करण्यासाठी रब्बी ज्वारीच्या लागवड पद्धतीत थोडासा बदल करावा लागतो. आपल्याकडे असलेला ठिबक संच आणि भाजीपाला पिकासाठीच्या लॅटरल वापरता येतात. मध्यम ते हलक्या जमिनीसाठी दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी व दोन झाडांतील अंतर १५ सेंमी इतके ठेवावे. मध्ये ७५ सेंमीचा मोकळा पट्टा ठेवावा. एका जोडओळीसाठी एक ठिबक नळी वापरावी.

भारी जमिनीसाठी दोन ओळीतील अंतर ६० सेंमी व दोन झाडांतील अंतर १२ सेंमी इतके असावे. यामुळे प्रति हेक्टर ज्वारीच्या झाडांची संख्या राखता येईल. उगवणीनंतर कोळपणीच्या साह्याने प्रत्येक ओळीस माती लावून वरंबा तयार करावा.

लॅटरलची निवड ः ज्वारीसाठी शेताच्या किंवा पिकाच्या ओळीच्या लांबीनुसार १२ किंवा १६ मिमी व्यासाच्या इनलाइन नळ्या वापराव्यात. यामध्ये साधारण ३० ते ४० सेंमी अंतरावरील व २.४ लिटर प्रति तास प्रवाह असलेल्या ड्रीपर (तोट्या) अशी इनलाइन लॅटरल निवडावी. उपलब्ध लॅटरलमधील ड्रीपरचा प्रवाह जास्त असल्यास भारी जमिनीसाठी त्यातील अंतर ४० ते ५० सेंमीपर्यंत असलेली इनलाइन लॅटरल निवडता येईल.

रब्बी ज्वारीसाठी ठिबक सिंचनाद्वारे लागणाऱ्या पाण्याची गरज ही झाडाची वाढीची अवस्था, बाष्पीभवनाचा वेग, पात्र गुणांक, पिकांचा गुणांक, जमिनीचा प्रकार, ओलाव्याचे क्षेत्र यावर अवलंबून असते. रब्बी हंगामात बाष्पीभवनाचा वेग साधारणपणे कमी असल्यामुळे (२ ते ५ मिलि प्रति दिवस) हे लक्षात घ्यावे. त्यानुसार आणि विजेची उपलब्धता याचा विचार करून संच दर दोन किंवा तीन दिवसांनी चालवावा.

Rabi Jowar
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

रब्बी हंगामात काही भागात साधारण २ ते ३ वेळा पाऊस पडतो. त्या काळात ठिबक संच चालविण्याची गरज नाही. वरील सर्व घटक लक्षात घेतल्यास रब्बी ज्वारीच्या वाढीच्या कालावधीत (पेरणीपासून १०० ते ११० दिवस) सर्वसाधारणपणे १५ ते २५ वेळा ठिबक संच चालवावा लागेल.

ठिबक संच दर तीन दिवसांनी चालविल्यास ३ दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन गृहीत धरावे लागेल. रब्बी ज्वारीची लागवड ४५ × १५ सेंमी अंतरावर असेल व इनलाईन लॅटरलवर २.४ लि/तास प्रवाह असलेल्या ठिबक तोट्या ३० सेंमी अंतरावर बसविलेल्या असल्यास ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा, या माहितीसाठी तक्ता पाहा.

याद्वारे उपयुक्त पाऊस विचारात घेतल्यास प्रत्येक तोटीद्वारे साधारण ४ ते ५ झाडांसाठी रब्बी ज्वारीच्या वाढीच्या पूर्ण कालावधीमध्ये ६० ते ९० लिटर इतके पाणी दिले जाते. म्हणजेच प्रत्येक झाडास १५ ते २० लिटर पाणी मिळते. ठिबक संच किंवा लागवड रचनेत काही बदल केल्यास संच चालविण्याच्या कालावधीमध्ये बदल होऊ शकतो.

- डॉ. उदय खोडके, (निवृत्त शास्त्रज्ञ, पाणी व्यवस्थापन योजना),

९४२२१७८०२५

- डॉ. सुरेश आंबेकर, (निवृत्त ज्वारी पैदासकार), ९४२०७०६९०८

(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Rabi Jowar
Crop Damage : चारच तास वीजपुरवठ्यामुळे पिके होरपळली

पेरणीनंतर दिवस पिकांचा गुणांक तीन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन, मिमी

५ १० १५ २०

संच चालविण्याचा काळ, मिनिटे

० ते २० ०.३६ १० १५ २० ३०

२१ ते ५५ ०.७० १८ ३६ ५५ ७५

५५ ते ९० १.०० ३५ ७० १०५ १४०

९९ ते १०० किंवा ११० ०.७५ २६ ५५ ८० १०५

विद्राव्य खतांचा वापर

रब्बी ज्वारीसाठी ठिबक सिंचन संचाचा वापर केल्यास ठिबकद्वारे खते देणे सोयीचे होते. अशा वेळी शिफारशी केलेल्या खताच्या मात्रेच्या ७५% प्रमाणात खते दिली तरी ती पुरेशी ठरेल. खते देण्यासाठी पिकाच्या क्षेत्रास लागणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार व्हेन्चुरीची निवड करावी. (३/४’,१’, ११/४’, ११/२ इंच.)

काही विद्राव्य खतांच्या ग्रेडमध्ये इतरही आवश्यक अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. १९:१९:१९, १२:६१:०, ०:५२:३४, १३:०:४५, ००:५० या विद्राव्य खताच्या ग्रेडसोबतच युरिया व पाण्यात पूर्णपणे विरघळणारा पोटॅश यांचाही ठिबकद्वारे वापर करता येतो. यासाठी शिफारशीमध्ये दिलेले नत्र (८० किलो/हे.) पाच ते सहा वेळा विभागून, स्फुरद (४० किलो/हे.) तीन वेळा विभागून व पालाश (४० किलो/हे.) पाच वेळा विभागून देता येते.

Rabi Jowar
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

ठिबक संचातून खते देताना सुरुवातीस १५ ते २० मिनिटे संच साध्या पाण्यासाठी चालवून झाडाभोवती ओलावा तयार करून घ्यावा. त्यानंतर खतमिश्रित पाणी सोडावे. खतमिश्रित पाणी दिल्यानंतर पुन्हा साध्या पाण्यासाठी संच १० ते १५ मिनिटे चालवावा.

योग्य पद्धतीने ठिबक सिंचनासाठी वापर केल्या कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांना ज्वारीचे दुप्पट ते तिप्पट उत्पादन हमखास मिळू शकते. सोबतच जनावरांसाठी चांगल्या प्रतीचा चाराही मिळेल. सध्या सुरू असलेल्या प्रयोगामध्ये कोरडवाहू परिस्थितीत हेक्टरी १५ ते १६ क्विंटल तर ठिबक सिंचन वापरल्यामुळे ४५ ते ५० क्विंटल इतके अधिक उत्पादन मिळाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com