Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : मार्चतील नुकसानीस नागपूर, कोकण विभागाला २७ कोटी

राज्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नागपूर आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांना २७ कोटी रुपयांची मदत वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नुकसान (Crop Damage) झालेल्या नागपूर आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांना २७ कोटी रुपयांची मदत वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ११ कोटी ५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

अवकाळी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नाशिक आणि अन्यत्र द्राक्षांच्या बागा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागातील शेतकऱ्यांना या आधी मदत केली आहे.

अवकाळी पावसाने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढी मदत केली जाणार आहे. त्यानुसार कोकण आणि नागपूर या दोन विभागांसाठी २७ कोटी १८ लाख ५२ हजार रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात येईल. यामध्ये नागपूर विभागासाठी ११ कोटी ८७ लाख तर कोकण विभागासाठी १५ कोटी ३१ लाख ४९ हजार रुपये देण्यात येतील.

नागपूर विभागात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी ७ लाख ४६ हजार तर कोकण विभागात पालघर जिल्ह्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपये मदत करण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोकण विभागात एकही रुपयाची मदत करण्यात आलेली नाही.

नागपूर विभागाची जिल्हानिहाय मदत

नागपूर : ९ कोटी ७ लाख ४६ हजार

भंडारा : २१ लाख ८१ हजार

गोंदिया : २५ लाख ४० हजार

चंद्रपूर : ५४ लाख ३१ हजार

गडचिरोली : १ कोटी ७८ लाख

कोकण विभागाची जिल्हानिहाय मदत

ठाणे : १ कोटी १५ लाख ६० हजार

पालघर : ११ कोटी ५० लाख ८० हजार

रायगड : २ कोटी ६१ हजार ३७ हजार

रत्नागिरी : ०

सिंधुदुर्ग : ३ लाख ७२ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी

Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर

Chilli Business Story: मिरची विक्रीला दिले व्यावसायिक रूप

Indian Politics: साळसूद सत्ताधारी, सावध विरोधक

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

SCROLL FOR NEXT