Akola Crop Damage Update : अकोला जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यात अवकाळी पावसाने दोन हजार ५९३.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते. याचा तीन हजार ६५१ शेतकऱ्यांना फटका बसला होता.
या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून शासनाने चार कोटी ४९ लाख ८३ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यात सहा व सात मार्च, तसेच नऊ आणि १५ ते १९ मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली होती. जिल्ह्यातील बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटका बसला होता.
लिंबू, आंबा, गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग कांदा, मूग, कलिंगड, खरबूज या पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये ६ व ७ मार्च रोजी बागायती १०८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते.
त्यासाठी ३५ लाख ३८ हजार ८९० रुपये मंजूर झाले आहेत. ही मदत ७ गावातील २८६ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
१५ ते १९ मार्च दरम्यान बागायती २ हजार २२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ३ कोटी ७७ लाख ९० हजार ६६० रुपये मंजूर झाले असून ही मदत ३ हजार १३१ शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच १६२ हेक्टर क्षेत्रावरील फळकांचेही नुकसान झाले असून यासाठी ३६ हजार ५६ हजार २५० रुपये मिळणार आहेत.
आता उर्वरित मदतीची प्रतीक्षा
प्राथमिक अंदाजानुसार याही महिन्यात ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ७ एप्रिल रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार ५ हजार २४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झालेली आहे.
तसेच वीज कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू व १६ जनावरेही दगावलेली आहेत. शिवाय ४६ घरांचेही नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात येत असून त्यानंतर मदत जाहीर होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.