Irshalwadi Landslide agrowon
ताज्या बातम्या

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा वाढला; दुर्घटनेच्या ठिकाणची आता परिस्थिती काय?

Raigad Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने आख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत गावातील मृतांचा आकडा 26 पर्यंत पोहचतला आहे.

Team Agrowon

Irshalwadi Rescue Operation : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने आख्खं गाव गाढलं गेले. या दुर्घटनेनंतर दोन दिवसांपासून बचावकार्य सुरू असून यात मृतांचा आकडा २६ लोकांचा मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक अजून बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दोन दिवसांपूर्वीच तेथे दरड कोसळल्याने अवघे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले होते. ४५० लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये दुखाचा डोंगर कोसळला. यात काही लोकांनी कसाबसा आपला जीव वाचवला. पण १०० हून अधिक या ढिगाऱ्याखाली गाढले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू झाले. पण मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे मशीनरी घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. परंतु ४ एनडीआरएफच्या टीम आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. अनेक जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. मात्र दुर्दैवाने २६ लोकांचा मृत्यू झाला. तर अजूनही १०५ लोक बेपत्ता आहेत.

२२ मृतांमध्ये ११ स्त्रिया व ११ पुरुषांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ११ जणांना प्रथमोपचार करुन सोडण्यात आलं आहे. ६ जखमींवर खालापूर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका जखमी रुग्णावर पनवेलच्या उपजिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तर तीन रुग्णांवर MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात भूस्खलन झालेल्या ईर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT