Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहनपर योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २३ कोटी

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत बुधवार (ता. २६) पर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ४४३ शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर एकूण २३ कोटी ३९ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waive Scheme) अंतर्गत नियमित प्रोत्साहनपर लाभ योजने (Farmer Incentive Subsidy Scheme) अंतर्गत बुधवार (ता. २६) पर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ४४३ शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर एकूण २३ कोटी ३९ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत २०१७-१८,२०१८-२९.२०१९-२० या तीन वर्षांत घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकयांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे.त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे.

या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील विविध १६ बँकांच्या ४० हजार ८४८ शेतकरी खातेदारांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. विशिष्ट क्रमांकासह ९ हजार ७४१ लाभार्थींची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. बँकस्तरावर संबंधित शाखा, तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. बुधवार (ता. २६)पर्यंत शेतकऱ्यांनी ९ हजार २३८ कर्जखात्यांचे (९४.८४ टक्के) आधारप्रमाणीकरण करून घेतले आहे.

एकूण १२६ कर्जखात्याबाबत तक्रारी प्राप्त आहेत. त्यापैकी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ९० आणि तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ३६ तक्रारी प्रलंबित आहेत. सर्व बँकाच्या मिळू एकूण ७ हजार ४४३ लाभार्थींच्या खात्यावर २३ कोटी ३९ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली.

बँकनिहाय लाभ हस्तांतर

स्थिती (रक्कम कोटी रुपये)

बॅंक लाभार्थी

शेतकरी संख्या रक्कम परभणी जि.म.स.बँक ६१३५ १७.४२४४

महाराष्ट्र ग्रामीण बँक ५८२ २.६१५३ बँक ऑफ महाराष्ट्र १९६ ०.९४५१

भारतीय स्टेट बँक ८८ ०.४१०२ युनियन बँक ३३ ०.१६५०

बँक ऑफ बडोदा १६ ०.७८० आयडीबीआय बँक १६ ०.७७१ कॅनरा बँक १३ ०.६२४

युको बँक ५ ०.२५० आयसीआयसीआय बँक ४ ०२ सेंट्रल बँक ऑफ इंडिया २ ०.१

बँक ऑफ इंडिया १ ०.०५० इंडियन बँक १ ०.०५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT