Rain Updates Agrowon
ताज्या बातम्या

Rain Updates: गडचिरोली जिल्ह्यातील २० मार्ग वाहतुकीसाठी बंद

पूर्व विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) ,चंद्रपूर (Chandrapur) या जिल्ह्यांमध्ये पावसाने वार्षिक सरासरीचे (Average Rainfall) टप्पा पार केला आहे. अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

टीप अॅग्रोवन

नागपूर : पूर्व विदर्भात पावसाचा जोर (Heavy Rains) कायम असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच एका गावाला पाण्याने वेढा घातल्याने नागरिक दहशतीमध्ये आहेत. पावसाची संततधार कायम असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या उपायाअंतर्गत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) ,चंद्रपूर (Chandrapur) या जिल्ह्यांमध्ये पावसाने वार्षिक सरासरीचे (Average Rainfall) टप्पा पार केला आहे. अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी अनेक नद्या फुगल्याने नदी काठांवरील अनेक गावे प्रभावीत झाली आहेत. त्यासोबतच छोट्या नाल्यावर असलेल्या रपट्यांवरुन पाणी वाहू लागल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. काही नद्यांवर कमी उंचीचे पूल असल्याने ते पूलदेखील पाण्याखाली आले आहेत.

धानोरा तालुक्यातील बोधनखेडा या गावाला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. गोदावरी प्राणहिता वैनगंगा व इंद्रावती या चारही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी या भागात जात सेल्फीचा मोह टाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील (Catchment Area) मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पातूनदेखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाच्या काठावर असलेल्या अनेक गावांना प्रशासनाकडून धोक्याची सूचना देण्यात आली आहे.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातदेखील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार मार्ग बंद करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांनादेखील संततधार पावसाचा फटका बसला. वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्येदेखील पावसाची रिपरीप कायम असून अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जोर कमी आहे.

गडचिरोलीतील वाहतूक बंद असलेले मार्ग

- आलापल्ली ते भामरागड

- बोरमपल्ली ते नेमडा

- झेंडा, दर्चेवाडा, बोंड्रा, मोयाबीन पेठा, विठ्ठलरावपेठा, परसेवाडा, विठ्ठलराव चेक, सिकेला नाका, रेगुठा

- कंबालपेठा ते चेकडा चेक

- कुंभी ते चांदाळा

- माडेगुल-रानेमाल-चांदाळा

- लगाम ते आलापल्ली

- परसेवाडा-जिफेला-जाफराबाद

- देवलमरी ते अहेरी

- साखरा वा चुरमुरा

- अहेरी ते भामरागड पोहच रस्ता

- उमानूर ते मरमपल्ली

- चामोर्शी ते गडचिरोली

- गडचिरोली ते आरमोरी

- वैरागड ते मानापूर

- आलापल्ली, भामरागड, लाहेरी बिनगुडा राष्ट्रीय महामार्ग

- आष्टी ते गोडपिंपरी

- आष्टी ते आलापल्ली

४१२ कुटुंबीयांचे स्थलांतर

गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे प्रभावीत झालेल्या ४१२ कुटुंबीयांना तसेच ३३३३ नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने या परिसरात काम करणारे सहा मजूर अडकून पडले होते. त्यांना प्रशासनाकडून बोटीच्या साह्याने रेस्क्यू करण्यात आले. विनोद शेंडे, प्रल्हाद बारस्कर, सुखी लाल, प्रकाश केवट, बाबुराव मेश्राम, सुजान केवट यांचा त्यामध्ये समावेश आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

अकोला : ४६.९

अमरावती : २०.२

बुलडाणा : ३३

ब्रह्मपुरी : २३

चंद्रपूर : ९९.०८

गडचिरोली : १३८.४

गोंदिया: १७.४

नागपूर : ७.४

वर्धा : ३.६

वाशिम : ८४.४

यवतमाळ : ४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT