Rajarambapu Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Bill : राजारामबापू कारखान्याचे अंतिम बिल १८९.८५ प्रमाणे

कारखान्याने २०२१-२२ मध्ये २० लाख ८३ हजार २२ टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये १० लाख ५९ हजार ५०० टन, वाटेगाव-सुरुल युनिट मध्ये ५ लाख ७० हजार ८०८ टन, तर कारंदवाडी युनिटमध्ये ४ लाख ५२ हजार ७१३ टन ऊस गाळपाचा समावेश आहे.

टीम ॲग्रोवन

इस्लामपूर, जि. सांगली ः राजारामबापू पाटील साखर कारखान्याकडे (Rajarambapu Sugar Factory) २०२१-२२ मध्ये गळितास आलेल्या साखराळे युनिट नं. एक, वाटेगाव- सुरुल युनिट नं. दोन व कारंदवाडी युनिट नं. तीनकडील उसास प्रतिटन २९८९.८५ चे अंतिम बिल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून आतापर्यंत २८०० रुपयांप्रमाणे ५८३ कोटी २५ लाख रुपये ऊस बिलाची (Sugarcane Bill Payment) रक्कम वर्ग केली आहे.

अंतिम बिल १८९.८५ प्रमाणे एकूण ३९ कोटी ५५ लाख रुपये गुरुवारी (ता. २९) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

कारखान्याने २०२१-२२ मध्ये २० लाख ८३ हजार २२ टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये १० लाख ५९ हजार ५०० टन, वाटेगाव-सुरुल युनिट मध्ये ५ लाख ७० हजार ८०८ टन, तर कारंदवाडी युनिटमध्ये ४ लाख ५२ हजार ७१३ टन ऊस गाळपाचा समावेश आहे.

आपल्या साखर कारखान्याकडे २०२१-२२ मध्ये गाळपास आलेल्या उसास प्रतिटन रुपये २ हजार ८०० प्रमाणे ५८३ कोटी २५ लाख रुपये यापूर्वीच अदा केले आहेत. कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल, कारंदवाडी व तिप्पेहळळी (जत) युनिटमध्ये ऑफ सिझनची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

आपली चारही युनिट १५ ऑक्टोबर रोजी सुरू करीत आहोत. साखराळे येथे ११ लाख, वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये ६ लाख व कारंदवाडी युनिटमध्ये पाच लाख तसेच तिप्पेहळ्ळी- जत युनिटमध्ये चार लाख असे एकूण २६ लाख टनाचे उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस आपल्या कारखान्यास गळितास पाठवून आपल्या साखर कारखान्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT