Sugarcane Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बेंगलोर येथे आंदोलन

ऊर्जा क्षेत्राच्या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २६) बेंगलोरमध्ये मोर्चा काढला.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

बेंगलोर, कर्नाटक ः ऊर्जा क्षेत्राच्या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात (Privatization) आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Farmers Protest) विविध प्रश्‍नांसंदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २६) बेंगलोरमध्ये मोर्चा (Bengaluru Farmers Protest) काढला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांना अटक केली. ऊर्जा क्षेत्राच्या प्रस्तावित खासगीकरणाला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला.

Sugarcane
Sugarcane Season : देशाच्या गळीत हंगामाचा बिगुल यंदा कर्नाटकातून

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वीज क्षेत्राच्या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात मोर्चा काढला. कर्नाटक पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकरी नेत्यांना अटक केली.

Sugarcane
Sugar Export : साखर निर्यात धोरणावरून उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात शीतयुद्ध

यामध्ये संदीप गिड्डे पाटील यांच्यासह शिवकुमार कक्काजी, जगजीत सिंह दल्लेवाल, शांताकुमार कुरबुरू, अभिमन्यू कोहड, बलदेव सिंह सिरसा, शंकर दरेकर आणि देशभरातील अन्य काही नेत्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सोमवारी बेंगलोर येथे आंदोलनादरम्यान कृषी उत्पादनांसाटी किमान आधारभूत किंमत सूचवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल नाकारण्याचा तसेच २६ नोव्हेंबर रोजी दिल्लीजवळ सिंघू सीमेवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

Sugarcane
Sugarcane Season : मुदतपूर्व धुराडे पेटल्यास थेट गुन्हा दाखल होणार

तत्पूर्वी शेतकरी नेने शांताकुमार कुरबुरू यांनी रविवारी (ता. २५) देशभरातील शेतकरी समुदायातील नेत्यांचा समावेश असलेल्या गोलमेज परिषदेत भाग घेतला. यानंतर पत्रकारांना त्यांनी सांगितले की, सरकारने एक समिती स्थापन केली आहे आणि वचन दिले आहे की कृषी उत्पादनांसाठी एमएसपीची हमी देणारा कायदा आणला जाईल. या समितीत शेतकऱ्यांचा समावेश नाही.

शेतकऱ्यांना बाहेर ठेवून स्थापन केलेल्या समितीचा अहवाल नाकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘आम्ही देशात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसपीची हमी देणारा कायदा डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींसह लागू करणे आवश्यक आहे, ते म्हणाले. ऊर्जा कायद्यातील प्रस्तावित सुधारणा वगळण्यात यावी आणि कृषी उत्पादनांवरील जीएसटी रद्द करण्याबरोबरच उसाचे भाव शास्त्रीय पद्धतीने निश्चित करावेत, असेही ते म्हणाले.

दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी करतानाच, गोलमेज परिषदेने सरकारला आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या ७५० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती केली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com